लाडक्या बहिनीही तासंतास रांगेत…
७२ गावांकरीता तीन बॅक शाखा…
रामटेक – राजु कापसे
आदिवासी क्षेत्राशी अनेकदा शासनातर्फे काही ना काही उनिवा राहतातच अनेक अडचणींना सामोरे जाणारा आदिवासी व ईतर समाज आता बॅकेच्या त्रासाला कंटाळला आहे. परीसरात आठ ग्रामपंचायती असून त्याअंतर्गत येणाऱ्या ३५ गावांकरीता एकच बॅक असल्याने मोठ्या अडचनींना सामोरे जावे लागत आहे. परीसरात ७२ गावांकरीता तीन शाखा असून त्यात हिवराबाजार व पवनी या भागातील ३७ गावांकरीता दोन शाखा असल्या तरी तेथेही जास्त गर्दी असते तर ३५ गावांकरीता एकच शाखा आहे. तेथे ग्राहका़ची कशी गोची होते.
यावर चर्चा न केलेलीच बरी देवलापार परीसरात करवाही, देवलापार व वडांबा ही मोठमोठी गावे आहेत परीसरात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही नामिनिमित्याने बॅकेत खाते काढणे गरजेचेच आहे. परंतू एकच शाखेमुळे या बॅकेत ग्राहकाची मोठी गर्दी होत आहे. बॅकेत वृद्ध, शेतकरी, महिला, विद्यार्थी, व्यापारी, कार्यालये, शाळा, कर्मचारी वेतन बचत व चालू यासारखे अनेक प्रकारचे खाते धारक आहेत याशिवाय सरकारी कार्यालये, शाळा यासारखी विविध खाते आहेत. तर संद्या लाडकी बहिणे योजनेची धामधुम सुरु आहे.
येथे बॅक ऑफ इंडियाची शाखा आहे. येथे दुसरी अन्य बॅक शाखा उघडण्याची गरज आहे. त्याकडे मात्र राजकीय पुढारी लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे. ग्राहकांच्या अडचनीकडे लक्ष देण्याची गरज आहे. या शाखेत देवलापार, करवाही, वडांबा, बांद्रा, पिंडकापार, बेलदा, कट्टा व डोंगरताल या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
नियमीत व्यवहारा व्यतीरिक्त याभागात तेंदूपत्ता बोनस, आदिवासी विद्यार्थी विद्यावेतन, धानाचे क्षेत्र असल्याने त्यावरील अनूदान, व आता नविन लाडकी बहीन या प्रकारचे अनेक खाते धारक येथे असल्याने ग्राहकांची गोची होत असुन कर्मचारीही त्रस्त आहेत. दुसरी शाखा उघडल्यास ग्राहकांची होणारी गोची व कर्मचाऱ्यांना होणारा त्रास दोन्ही पासुन सुटका होवू शकते.
कर्मचार्यांची दमशाक
एकच शाखा असल्याने के वाय सी तसेच आधार लिंक करीता मोठ्या प्रमाणात गर्दी असुन त्याकरीता दररोज सव्वासे ते दिडशे खाते लिंक करण्याकरीता ईमेल करावे लागत असुन त्यात कर्मचाऱ्यांची दमशाक होत आहे. एक कर्मचारी जरी सुटीवर गेला तर इतरांची मोठी पंचाईत होत असून त्याचा त्रास ग्राहकांना सोचावा लागत आहे.
३५ गावाची एकच बँक
देवलापार परीसरात बँकेची दुसरी शाखा गरजेची झाली आहे. मात्र राजकीय नेते याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीकांचा आहे. या शाखेत देवलापार, निमटोला, रामटेकडी, झिंझेरिया, रामनगर, महाजनटोला, डोंगरताल, सावरा, कडबीखेडा, उसरीपार, बांद्रा, गर्रा, खुर्सापार, करवाही, मानेगाव, छवारी, दुलारा, पिंडकापार, लोधा, गोंडीटेला, सितापार, बेलदा, नवेगाव, गोरेघाट, वडांबा, उमरी, जूनेवानी, टुयापार, न्यु तोतलाडोह, रय्यतवाडी,कट्टा, पेंढरई, सिंदेवानी, खिडकी या गावांकरीता ही शाखा आहे.