Thursday, September 19, 2024
Homeगुन्हेगारीरामटेक | चिखलनी करत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू…

रामटेक | चिखलनी करत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू…

रामटेक – राजु कापसे

देवलापार पोलीस स्टेशन हद्दीतील चोरबाहुली येथे शेतात चिखलनी करत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर चालकाचा दबून मृत्यू झाल्याची घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली आहे. माहितीनुसार, चोरखुमारी येथील रहिवासी दिलीप आहाके वय अंदाजे ४२ वर्ष.हे चोरबाहुली हद्दीतील शेतात चिखलनी करायला गेले असतांना अचानक ट्रॅक्टर पलटी झाली.ट्रॅक्टर पूर्णपणे चालकाच्या अंगावर पडल्याने ट्रॅक्टरखाली दबून त्याचा मृत्यू झाला…

घटनेची माहिती देवलापार पोलिसांना देण्यात आली.देवलापार पोलीस व टोल प्लाझा कर्मचारी घटनास्थळी पोहचले व मृतकाला शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे नेण्यात आले असुन वृत्त लिहिस्तोवर पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: