Sunday, December 22, 2024
Homeराज्यरामटेक | गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण...

रामटेक | गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण…

रामटेक – राजु कापसे

राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी येथील ज्येष्ठ शिक्षक व आकाशझेप फाउंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांचे वाढदिवसानिमित्त २० जुलैला शाळेतील गरजू व एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून आकाशझेप फाउंडेशन तर्फे मदतीचा हात देण्यात आला.

प्रस्तुत कार्यक्रम राष्ट्रीय आदर्श विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव मयंकराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली, शाळेचे मुख्याध्यापक राजीव तांदूळकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पारशिवनी पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य चेतन देशमुख, प्राध्यापक अरविंद दुनेदार, शिक्षक अनिल कोल्हे यांनी मार्गदर्शनातून कडबे गुरुजींच्या जीवन कार्याला उजाळा दिला.

शाळेचे गरजू विद्यार्थी प्रणय आरसे संदीप टेकाम, प्रणित इनवाते, आयुष गुरुभेले, नैतिक वरठी, पंकज धूर्वे अनुष मेश्राम, अथर्व मेश्राम, काव्य भोतमांगे, प्रणय ऊरणाल, निकेश इनवाते, दृष्टी धूर्वे, आकांक्षा मरकाम, आर्या कोहळे, कुणाल टेकाम, आशिष बर्वे, हिमांशू डोंगरे, साहिल राऊत सोनाक्षी उईके, अंजू धुर्वे, अभिलाषा धुर्वे, कल्याणी मेंढेकर, सुजल पनवारे, ऋषभ भलावी, सागर भलावी, कीर्ती उईके, आयुष राऊत, पौर्णिमा मेंढेकर, यांना वही पेन व कंपास पेटी व खाऊ वितरण करण्यात आले.

शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून ‘झाडे लावा झाडे जगवा’ चा कृतिशील संदेश देण्यात आला. वाढदिवसाचा केक कापून कडबे गुरुजींना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शाळेचे शिक्षक प्रशांत पोकळे, दिलीप पवार, सतीश जुननकर, अमित मेश्राम, शैलेंद्र देशमुख, रितेश मैंद, सौ. अर्चना येरखेडे, प्रा. मोहना वाघ, शिक्षकेतर कर्मचारी लीलाधर तांदूळकर, गोविंदा कोठेकर, राशिद शेख, मोरेश्वर दुनेदार व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: