उपविभागिय अधिकार्यांना दिले निवेदन…
रामटेक 🙁 प्रतिनिधी) गोंडवाना गणतंत्र पार्टी व सामाजिक संघटना च्या वतीने दिनांक २५/०९/२०२३ ला तहसिल कार्यालय रामटेक येथे विविध मागण्या या कायदेशिर असून तात्काळ त्याची अंबलबजावणी करण्यात यावी की, जेणेकरून समाजातील एक विशिष्ट घटकावर त्याचा सर्वात जास्त परिणाम होत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या जुलमी व दडपशाही धोरणांमुळे समाजातील घटकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. करिता खालिलप्रमाणे मागण्यासाठी धरणे आंदोलन करत रामटेक उपविभागिय अधिकारी वंदना सवरंगपते यांना गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य हरिष ऊईके यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकाने ने पारित केलेले ‘वन संवर्धन एवं संरक्षण अधिनियम २०२३’ त्वरित रद्द करण्यात यावे.
‘अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता)
अधिनियम २००६’ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. गोंडवाणा संग्रहालय जंगलात नाही ‘सुराबर्डी’ नागपूर येथेच बनविण्यात यावे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यात येवू नये. मौजा गुगलडोह तह. रामटेक येथील मॅगनिज खाणीचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा. मौजा गुगलडोह येथील तलावाचे (खंड विकास अधिकारी पं. स. रामटेक) यांनी अवैधरित्या केलेले लिलाव त्वरित रद्द करण्यात यावा.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक भर्ती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी. जंगल-झुडपी अतिक्रमण धारकांना लवकरात लवकर जमीनीचे पट्टे वाटप करण्यात यावे. पेंच राष्ट्रीय उद्यान मधील हिंसकप्राण्यापासून (वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर) पासून परिसरातील मानव व शेतपिके संरक्षण करण्याकरिता लोखंडी जाळीचे कंपाऊंड त्वरित करण्यात यावे.
घरकुल (शबरी, रमाई, प्रधानमंत्री) योजनेची अनुदान राशी पाच लक्ष रुपये करण्यात यावी.
देवलापार ला पूर्ण तहसिलचा दर्जा देण्यात यावा.
रामटेक – पारशिवनी, ग्रामीण भागातील विद्यूत प्रवाह खंडीत करणे त्वरित बंद करण्यात यावा.
जिल्हा परिषद च्या ६२ हजार शाळा खाजगीकरण करण्याचा महाराष्ट्र शासनाच्या प्रस्ताव त्वरीत रद्द करण्यात यावा.
या सवैधानिक न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण कराव्यात, करिता विनंतीसह निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे प्रदेश अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य हरिष भाऊ उईके,राष्टीय अध्यक्ष राजे वासुदेवशाह टेकाम,प्रहार चे रमेश कारामोरे,एड.प्रफुल अंबादे, सुधाकर आत्राम,राजेश इरपती,मंगलालाई उईके, गंगाताई टेकाम, धनराज मडावी, धर्मराज कोकोडे,चंदनसिंग उईके, दिनेश सेनाम, गुड्डुभाई ऊईके, ताराचंद सलामे, शेसराव कदम, कृपासागर भोवते ज्ञानसिंग खंडाते, भावराव कुमरे,अशोक, नरेन्द्र वाडके, सदाशिव पंधरे,राजु सय्याम सह आदी प्रामुख्याने उपस्थीत होते.