Wednesday, October 16, 2024
Homeराज्यरामटेक | कन्हान परिसरात वाघाच्या मृत्यु...

रामटेक | कन्हान परिसरात वाघाच्या मृत्यु…

वनविभागात खळबळ

रामटेक – राजु कापसे

रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पटगोवारी उपवनक्षेत्रातील कन्हान नियतक्षेत्रातील कन्हान परीसरात मौजा खंडाळा (घ) येथे शेत सर्व्हे क्र. 97/1 मध्ये श्री. प्रकाश आंबटकर यांचे शेतात वाघाच्या मृत्युची घटना घडली. घटनेने वनविभागात खळबळ उडालेली आहे.

रामटेक वनपरीक्षेत्राचे वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. अनील भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी दुपारी 02.00 च्या सुमारास उघडकीस आली. मौजा खंडाळा (घ) येथील शेतकरी श्री. उमांकांत हटवार यांनी शेतामध्ये वाघाचा मृत्यु झाल्याची बातमी कन्हान नियतक्षेत्राचे वनरक्षक श्री. एन. के. मेश्राम यांना दिली.

त्यानंतर तात्काळ वनविभागाची चमु घटनास्थळी पोहचली. श्री.आर.एम. घाडगे, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-1), रामटेक यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदविण्यात आला. त्यानंतर दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी दुपारी 2.00 च्या सुमारास राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आधारभुत प्रक्रिया (SOP) नुसार निरीक्षण चमु तयार करुन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच अतिरीक्त पथक तयार करुन घटनास्थळासभोवतील शेत शिवार परिसराची तपासणी करण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार 3 ते 4 वर्षे वय असलेला वाघाच्या सर्व अवयव साबुत होते त्यामुळे सदर वाघाचा मृत्यु हदय व फुफुसचा क्रिया बंद पडल्यामुळे झाला असावा, अशी शक्यता शवविच्छेदन करतांना पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांकडुन वर्तविण्यात आली आहे.

सदर वाघ हा नर असल्याचे पशुवैद्यकिय अधिकारी यांचे मत आहे. शवविच्छेदन NTCA च्या SOP नुसार करण्यात आले असुन यावेळी पशुवैद्यकिय अधिकारीचे चमु ज्यात डॉ. पी. एम. सोनकुसरे, डॉ. किशोर भदाणे, डॉ. बी. एल. मुडे, डॉ. आर. डब्ल्यु. रेवतकर, डॉ. एम. एम. कापगते, यांनी शवविच्छेदन केले असुन लिंग परिक्षण व इतर विष परिक्षणाकरिता सॅम्पल घेण्यात आले असुन प्रादेशिक फॉरेन्सीक प्रयोगशाळा, नागपूर येथे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

शव विच्छेदनावेळी डॉ. श्री. भारत सिंह हाडा, उपवनसरंक्षक, नागपुर वनविभाग, श्री. एन. जी. चांदेवार, विभागीय वन अधिकारी, इको टुरीझम बोर्ड, नागपुर, श्री. आर. एम. घाडगे सहायक वनसरंक्षक, रामटेक, NTCA चे प्रतिनीधी डॉ. बहार बावीसकर, PCCF (WL) चे प्रतिनीधी श्री. मंदार पिंगळे, मानद वन्यजीव रक्षक श्री. अविनाश लोंढे, श्री. अजिंक्य भटकर, कुंदन हाते माजी सदस्य राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ, नागपुर, उपस्थीत होते. घटनास्थळी पुढील तपास व चौकशी सुरु आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: