Monday, December 23, 2024
Homeराज्यदहावीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी - रामटेक शहर व तालुक्यात दहावीच्या निकालाने...

दहावीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी – रामटेक शहर व तालुक्यात दहावीच्या निकालाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण…

रामटेक – राजु कापसे

नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात रामटेक तालुक्याचा एकूण निकाल % लागला आहे.रामटेक येथील राष्ट्रीय आदर्श विद्यालयाचा एकुण निळाल ८२.१७ एवढा लागलेला असुन प्रथम क्रमांक कु. प्रेरणा लक्ष्मण गजभिये ( ८२.८०%) द्वितीय क्रमांक कु. रिया अनील महाजन ( ८१.८०%) तृतीय क्रमांक कु. जानवी नागोराव थोटे ( ७९.६०%)ने प्राप्त केला.

समर्थ हायस्कुल रामटेक या शाळेचा एकूण निकाल ९२.१४% लागला असून शाळेतून प्रथम क्रमांक श्रेया मनोहर वानोडे (९२.६०%)द्वितीय क्रमांक मृनल विजयकुमार लांडे (९१.८०) , तृतीय जानवी प्रशांत फुरसुले (९०.८०), ने प्राप्त केला. त्याचप्रमाणे समर्थ कॉन्व्हेंट रामटेक येथे प्रथम क्रमांक शर्वरी चरडे (९२ % ),

द्वितीय शायली अविनाश शेंडे (८७ %), तृतीय आर्या लांजेवार (८६ % ) तसेच शितलवाडीतिल ज्ञानदिप कॉन्व्हेंट येथे प्रथम क्रमांक ऐश्वर्या अंगतलाल मोहने (९३.६० % ), इंशा शकील कुरेशी (९१.८०%) तथा तृतीय माधवी किसना पाटील (९०.६० % ) आहे. रामजी महाजन देशमुख नगर परीषद शाळेतील प्रथम क्रमांक श्रेयश चिंधुजी मानकर (७४.८० % ) द्वितीय रोहीनी तुळशीराम मसराम (७२.४० % ),

तृतीय फिजा तसलीम शेख (६९.६०%) आहे. स्व.इंदिरा गांधी विद्यालय, नगरधन शाळेचा एकूण निकाल ९५.८७% लागला असून प्रथम क्रमांक समीक्षा रामकृष्ण दमाहे ( ८७.४०%) द्वितीय क्रमांक अस्मिता रामु देशमुख ( ८५%) तृतीय क्रमांक सुप्रीया रामेश्वर मेंघरे ( ८४.८०%)ने पटकाविला आहे.

जयसेवा आदर्श हायस्कुल पवनी येथील प्रथम क्रमांक त्रिशा श्रावण बोरकर (९०.८० % ), द्वितीय ज्योती दयाराम अवथरे (८८.४०%) तृतीय मुस्कान सुरेश ठाकुर (८५.२० % ) आहे.

गुणवत्तेत आलेल्या तसेच विद्यालयातुन पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंताचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक मंडळी ,पालकमंडळी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: