राजु कापसे
रामटेक
रामटेक : उपाय ही सामाजिक संस्था मौदा क्षेत्रामध्ये गेल्या १४ वर्षापासून सक्रिय आहे. उपाय संस्थेची स्थापना १९ सप्टेंबर २०१० या दिवशी झाली. उपाय संस्थेमार्फत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.
उपाय या संस्थेद्वारा गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, महिला सशक्तिकरण, स्वच्छता अभियान, वार्षिक क्रीडा स्पर्धा, डे बोर्डिंग सेंटर, कौशल्य विकास ची कामे केली जातात. मुलांचे कला कौशल्ये वाढविण्यासाठी आणि अभ्यासासाठी मौदा येथे सुसज्ज वाचनालय सुरू करण्यात आले आहे.
यावर्षी दि. २२ सप्टेंबर या दिवशी उपाय मौदा चा वार्षिक महोत्सव एनटीपीसी हॉल येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून एनटीपीसी मौदा चे सीजीएम दीपक रंजन देहुरी, उपमहाप्रबंधक सुभाषित गुहा, संजय शर्मा, योगेंद्र रामकृष्ण, मनोज गावंडे, परांजपे, समृद्धी लेडीज क्लब च्या सदस्या, केशव स्वामी शिक्षण संस्था मौदा चे संचालक सदाशिव सावनेरकर, उपाय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वरून श्रीवास्तव, मौदा झोनचे झोनल डायरेक्टर आनंद कुंभलकर, कपिल सावनेरकर आणि शेकडो स्वयंसेवक उपस्थित होते.
या वार्षिक महोत्सवामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. उपाय मौदा झोनच्या दहा केंद्रांमधून आणि नागपूर झोन च्या सहा केंद्रांमधून ६०० विद्यार्थी व स्वयंसेवक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये अनेक सुंदर नृत्य आणि नाटिका सादर करण्यात आल्या .परीक्षेत चांगले गुण मिळविणाऱ्या मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. वडोदा सेंटरला सर्वोत्कृष्ट केंद्राचा पुरस्कार मिळाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाय संस्थेच्या स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.