Saturday, November 23, 2024
Homeराज्यरामटेक | उभ्या डाक पार्सल कंटेनर ला कारची धडक, ३ ठार...

रामटेक | उभ्या डाक पार्सल कंटेनर ला कारची धडक, ३ ठार…

  • रामटेक – भंडारा मार्गावरील अरोली जवळची घटना
  • मृतकात सत्तर वर्षीय वृद्धासह दोन चिमुकल्यांचा समावेश
  • जखमींना नागपूरला हलविले

सोनका पळसगाव जिल्हा भंडारा येथील कुटुंबीय रामटेक गडमंदिरावर दर्शनासाठी आले असतांना दर्शन झाल्यावर परतीच्या मार्गावर असतांना रामटेक ते भंडारा रोड वरील आरोली पोलीस स्टेशन अंतर्गत आरोली जवळ उभ्या डाक पार्सल च्या कंटेनर ला कार धडकल्याची घटना काल दि. ९ जुलै च्या साडेतीन वाजता च्या सुमारास घडली. मृतकांमध्ये एक ७० वर्षीय वृद्ध व दोन चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहीती पोलिसांकडून प्राप्त झालेली आहे.

दर्शन झाल्यावर सोनका पळसगाव येथील कुटूंबीय परतीच्या मार्गावर निघाले होते. दरम्यान अरोलीजवळ कोणतीही पार्कींग सुचना न देता डाक पार्सल चा आयशर ट्रक क्र. एम.एच. ४० सी.डी. ९८०२ च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक उभा केला होता.

दरम्यान रामटेक कडून येणारी कार रस्त्यावर उभ्या असलेल्या पार्सल कंटेनरला धडकली. अपघाताची वार्ता पसरताच जखमींना तात्काळ रामटेक उपजिल्हा रुग्णालय येथे आनण्यात आले. मात्र येथे तपासणी दरम्यान परशुराम लहानू भेंडारकर वय ७० वर्षे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

यानंतर उर्वरीत गंभीर जखमींना नागपुर येथे रेफर करण्यात आले. जखमींमध्ये राजेश भेंडारकर यांचा ८ महिन्यांचा मुलगा हिमांशु, राजेश भेंडारकर, वय ४०, त्यांची पत्नी राजेश भेंडारकर ३५ वर्षे, भार्गवी ८ वर्ष , भाग्या बोंद्रे वय ५, जुळी मुले आणि मेघा बोंद्रे यांचा समावेश आहे. दरम्यान तेथे हिमांशु राजेश भेंडारकर वय ८ महीने तसेच भार्गवी बोंदरे वय ८ वर्ष यांचाही मृत्यु झाल्याची माहिती आहे.

सामाजिक कार्यकर्ते व वकिलांनी जखमींना केली मदत घटना घडली त्यावेळी रामटेकचे हाय कोर्टाचे वकील अॅड. प्रफुल्ल अंबादे आणि शिवसेनेचे धर्मेश भागलकर हे तेथुन जात होते. अपघाताचे भिषण चित्र दिसताच त्यांनी मदतीला धावुन जात तात्काळ जखमींना गाडीतून बाहेर काढून रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. व घटनेची माहिती पोलिसांना व कुटुंबीयांना दिली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: