रामटेक – राजु कापसे
रामटेक पंचायत समिती अंतर्गत आजनी येथे नागपूर जिल्ह्यातील प्रथम आदर्श शाळेला 1 कोटी 1लक्ष मंजूर करून शाळेचे बांधकाम करण्यात येणार आहे. सदर शाळेचे भूमिपूजन 30 जानेवारीला दुपारी 12 वाजता माजी मंत्री सुनील बाबू केदार हस्ते संपन्न होणार आहे.
सदर शाळेला निधी मिळवून देण्यात जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे यांचा सिंहाच्या वाटा आहे. सरपंच मनोज लील्हारे यांनी प्रयत्नाची पराकाष्टा करून, आजनी गावातील विद्यार्थ्यांचे शिक्षण चांगले व्हावे, त्यांना डिजिटल शाळा उपलब्ध व्हावी, विद्यार्थ्यांनी शिकून गावाचे नाव रोशन करावे या उदात्त हेतूने त्यांनी सरपंच झाल्यानंतर प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
आणि माजी मंत्री सुनील बाबू केदार, जिल्हा परिषद अध्यक्ष कोकड्डेताई व जिल्हा परिषद सदस्य दुद्राम सहावा लाखे यांचे आभार मानले. भूमीपूजन कार्यक्रमाला माजी मंत्री सुनील बाबू केदार, नगरधन सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य दूधराम सव्वालाखे, जिल्हा परिषद अध्यक्ष कोकड्डेताई, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रश्मीताई बर्वे, जिल्हा परिषद च्या उपाध्यक्ष कुंदाताई राऊत, रामटेक पंचायत समितीचे सभापती नरेंद्र बंधाटे, अजनी ग्रामपंचायतचे सरपंच मनोज लील्हारे,
उपसरपंच ब्रिजलाल उपराडे, अजनी ग्रामपंचायत सदस्य देवराव दमाहे, मनोज उपराडे, उर्मिला बावणे, आरती नागपुरे, नंदाताई पारधी, रामकृष्ण दमाहे कल्पना लील्हारे, सविता मोहनकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर भूमिपूजन कार्यक्रमाला गावकरी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आजनी ग्रामपंचायतचे सरपंच मनोज लील्हारे यांनी केले आहे