रामटेक शहर प्रतिनिधी :-
रामटेक : शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठल्यावर रामटेक विधानसभा क्षेत्रातील नागरिकांमध्ये विविध चर्चांना जणु उत आला होता. महाराष्ट्रात भाजपा तथा शिंदे गट यांची संयुक्त सत्ता असून नुकतेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठल्याने आता रामटेक विधानसभा क्षेत्राच्या आगामी निवडणुका दरम्यान चा उमेदवार कोण याबाबत रामटेक विधानसभा क्षेत्रातील नागरिकांमध्ये विविध चर्चांना जणू उत आलेला होता. तेव्हा हीच परिस्थिती ओळखून शिवसेनेचे धनुष्यबाण गोठल्याच्या दुसऱ्याच दिवशी दुपारी दीड वाजता दरम्यान भाजपाचे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी शहरातील किराड भवन येथे पत्र परिषद बोलवली व या पत्र परिषदेत त्यांनी नागरिकांमध्ये असलेल्या विविध उलट सुलट चर्चांना विराम लावत स्पष्ट स्पष्ट भूमिका पत्रकारांपुढे मांडली.
किरण भवन येथे पार पडलेल्या पत्र परिषदेमध्ये यावेळी प्रामुख्याने माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचेसह नमो नमो मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार, भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) डॉ. राजेश ठाकरे, सदानंद निमकर, बालचंद बादुले, विवेक तोतोडे , माजी नगरसेवक आलोक मानकर, तेजपाल सोलंकी , कैलास बरबटे, व्यंकट कारमोरे , लक्ष्मण केने हे प्रामुख्याने उपस्थित होते.
पत्रपरिषदेदरम्यान माजी आमदार रेड्डींनी आपले स्पष्ट व परखड मत मांडत सांगीतले की बंडखोर उमेदवारांना भाजपा पक्षात प्रवेश मुळीच नसून भाजपा रामटेक विधानसभा क्षेत्रातील कोर कमिटीने सामूहिक निर्णय केलेला आहे व त्यानुसार समोर येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या पक्ष आपल्या स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले. तसेच आमच्या पक्षातच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी गेले कित्येक वर्षापासून प्रामाणिकपणे कार्य करीत आहे तेव्हा त्यांनाही संधी मिळावी यासाठी बाहरी व बंडखोर उमेदवारांना आमच्या पक्षात मुळीच प्रवेश मिळणार नाही असे स्पष्ट व पारखड मत यावेळी पत्र परिषदेदरम्यान माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पत्रकारांपुढे मांडले.
पत्र परिषदेदरम्यान यावेळी उपस्थितांमध्ये रेखाताई दुणेदार , नरेश मेश्राम , वसंत कोकाटे , सुंदरलाल ताकोद , योगराज टेकाम , फजितराव सहारे , मनोहर डडुरे , प्रकाश वांढे , सागर पोटभरे , नरेश पोटभरे , अशोक कुथे , आशा पनीकर शालिनी बर्वे , सरिता लसुंते , प्रकाश वांढे , मयूर माटे दिनेश बादोले , अशोक कुथे , रजत गजभिये आदी. कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.