रामटेक – राजु कापसे
रामटेक लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचा उमेदवार खासदार म्हणून मोठ्या मतांनी आपण निवडून दिला.आता विधानसभा निवडणुकीत रामटेक विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्याल आणी परिवर्तन निश्चितच घडवणार असा विश्वास राज्याचे माजी मंत्री व महाविकास आघाडीचे नेते सुनील केदार यांनी येथे व्यक्त केले.
रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने रामटेकच्या देशमुख सेलिब्रेशन हॉलमध्ये वर्ष 2023-24 या वर्षीची वार्षिक आमसभा व शेतकरी मार्गदर्शन-प्रशिक्षण कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधित करीत होते. दिनांक 31 ऑगष्ट रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे माजी मंत्री राजेंद्र मुळक,जि.प.अध्यक्षा मुक्ता कोकड्डे,उपाध्यक्षा कुंदा राऊत,
कृउबास रामटेकचे सभापती सचिन किरपान,उपसभापती लक्ष्मी कुमरे,उबाठाचे रामटेक विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल बरबटे,जि.प.सदस्य दुधराम सव्वालाखे,पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे,मौदा पं.स.चे सभापती स्वप्नील श्रावणकर, रतिराम रघुवंशी,खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष अनिल गुप्ता, अनिल राय,अशोक चिखले, महेश बम्हनोटे,अरुण बनसोड,
कला ठाकरे,ॲड प्रफुल्ल अंबादे,रमेश तांदुळकर,दयाराम भोयर,विरेंद्र गजभिये,सुभाष तडस,रविंद्र कुमरे,सिताराम भारद्वाज,लेखीराम हटवार, कैलास खंडार,लोकेश बावनकर,डॉ इरफान अहमद आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरुवातीला बाजार समितीच्या आमसभेत सचिव हनुमंत महाजन यांनी बाजार समितीच्या कामकाजाची माहिती दिली.आर्थिक पत्रके सभेत ठेवली. 23-24 या आर्थिक वर्षात बाजार समीतीचा निव्वळ नफा 1 कोटी 10 लक्ष रुपये झाल्याचे सांगितले.
आमसभेनंतर उपस्थितांना कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी योगेश राऊत यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व पशुधन विकास अधिकारी डॉ पुजा जंगले यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
मुख्य कार्यक्रमात रतिराम रघुवंशी, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे,उबाठाचे विशाल बरबटे, राजेंद्र मुळक व सभापती सचिन किरपान यांनी उपस्थितांना संबोधित केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मंच संचालन त्रिलोक मेहर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव हनुमंत महाजन यांनी मानले.
या कार्यक्रमात लकी ड्रॉ पद्धतीने 81 भाग्यवंतांना बजाज कंपनीचे 6 स्टॅण्ड फॅन व 75 20 लीटर वॉटर कॅन मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.अन्य सर्व उपस्थितांना छत्री ही भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमात तालुक्यातील 800 वर शेतकरी उपस्थित होते.