रामटेक तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघाचे तहसिलदारांमार्फत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन…
सर्व्हर डॉऊनमुळे ई – पॉस मशीन निकामी…
ग्राहक मारत आहेत दुकानांच्या चकरा…
रामटेक – राजू कापसे
रामटेक – सर्व्हर डाऊनमुळे गेल्या आठवड्याभऱ्यापासुन धान्य वितरण प्रणाली प्रवावित झालेली असुन धान्य मिळत नसल्याने ग्राहक व स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये वादविवाद वाढलेले आहे. त्रस्त होवुन शेवटी रामटेक तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघाने काल दि. २९ जुलैला स्थानिक तहसिलदार रमेश कोळपे यांचेमार्फत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले असुन त्यात माहे जुलै-२०२४ चे वंचित लाभार्थी धान्य माहे ऑगस्ट – २०२४ मध्ये पुर्ण महिनाभर कॅरिफावर्ड मिळणेबाबत त्यांनी विनंती केलेली आहे.
निवेदनानुसार माहे जुलै, २०२४ चे धान्य वितरण सुरू झाल्यापासून ई- पॉस मशिन सुरळीत कार्यरत नाही. यामुळे लाभार्थी कार्डधारक व दुकानदारा मध्ये विनाकारण वाद निर्माण होत आहे. ई-पॉस नेटवर्क (सर्वरचा) त्रास रोजच निर्माण होत असून यामुळे धान्य वितरणावर परिणाम झालेला आहे.
करिता ई- पॉस नेटवर्क (सर्वर) व्यवस्थित सुरळीत सुरू राहण्याकरिता योग्य उपाय योजना त्वरीत करण्यात यावी अशी विनंतीही या निवेदनामार्फत करण्यात आली आहे. तसेच माहे जुलै-२०२४ चे धान्य वितरण सुरू – झाल्यापासुन ई- पॉस मशिन मध्ये दररोज नेटवर्क (सर्वरची) समस्या निर्माण होत आहे.
यामुळे लाभार्थी कार्डधारक धान्याची उचल न करता परत जात आहेत. करिता माहे जुलै – २०२४ चे वंचित लाभार्थीना त्यांचे धान्य माहे आगष्ट मध्ये पुर्ण महिनाभर कॅरि फारवर्ड व्दारे देण्यात यावे, लाभार्थ्यांना मिळणारे सर्व/वस्तु व मागील महिण्याची शिल्लक वस्तु हे एकाच पावतीवर निघावे जेणेकरून सर्व्हरवर अतिरिक्त भार येणार नाही व ते व्यवस्थित कार्य करेल अशीही विनंती दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेली आहे. निवेदन देतेवेळी रामचंद्र अडमाची, निलकंठ महाजन, दिनेश माकडे, महेश माकडे, महेश बम्हनोटे यांचे सह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.