राजु कापसे, रामटेक
रामटेक बसस्थानक येथील चौकात एका अनियंत्रित ट्रकच्या धडकेत मोटरसायकल वरील दोन व्यक्ती जखमी तर दोन चिमुकले बचावल्याची घटना काल दि. २ सप्टेंबर ला सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. घटनेनंतर ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला मात्र त्याला रामटेक फुल पोलिसांनी हमलापुरी जवळ पाठलाग करून पकडले.
सविस्तर वृत्त असे की दिनांक २ सप्टेंबर ला दुपारी ५ च्या सुमारास सुनिता शेषराव सोनवाने रा. मंगरली ता तुमसर जिल्हा भंडारा ही रक्षाबंधन निमित्त पती शेषराव दौलत सोनावणे वय ३५ व मुलगा आयुष वय ०७ व मुलगी आरूषी वय ०६ हे मोटर सायकलने क्रमांक MH 36 AK 9784 ने भागेमहारी येथे भावाकडे जात असताना रामटेक येथील बसस्थानक चौक येथील बायपासवर मनसर कडून येणारा ट्रक क्रमांक MH 40 BL 7779 चा वाहनावरून ताबा सुटल्याने त्याने मोटर सायकल ला जोरदार धडक दिली, त्यात शेषराव हा गंभीर जखमी झाला तर त्यांच्या पत्नी सुनीता ही जखमी झाले तर सोबत असलेले आयुष्य व आरुषी ट्रकच्या धडकेत बाजूला फेकल्यामुळे बचावले , यावेळी ट्रकने मोटरसायकलला तीनशे मीटर पर्यंत फरफटत नेले. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला मात्र पोलिसांना सूचना मिळतात ट्रकच्या पाठलाग करून हमलापुरी येथे पकडण्यात यश आले, पुढील तपास रामटेक पोलीस स्टेशन करीत आहे.
वर्दळीच्या चौकातच वाहतूक पोलीस बेपत्ता
शहरातील बस स्थानक चौक हा अतिशय वर्दळीचा चौक आहे येथे रामटेक ते मनसर, रामटेक ते तुमसर , रामटेक ते भंडारा , रामटेक ते हिवरा बाजार , रामटेक ते गांधी चौक असे अनेक मार्ग येथुन गेलेले आहेत तसेच येथेच बसस्थानक असल्यामुळे येथे नेहमी नागरिकांची वर्दळ असते. असे असतांनाही मात्र येथे वाहतूक कर्मचारी अमावस्या पौर्णिमा सारखा दिसतो बहुतेक त्याचमुळे की काय येथून ट्रक सारखी जड वाहने भरधाव वेगाने निघत असतात. पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.