राजु कापसे प्रतिनिधी
रामटेक :- रायपूर -मुलताई मार्गावरील आमडी -पारशीवणी या गावादरम्यान असलेल्या नयाकुंड नदीवरील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक कठड्याला धडक देऊन ४० ते ५० फूट उंचावरून ट्रक नदीच्या पात्रात कोसळला. यामध्ये चालक सुखरूप बचावला.
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नयाकुंड नदीवर स्टील वाहून नेणारा मालवाहू ट्रकची स्टेअरिंग फ्री होऊन चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट नदीत कोसडल्याची घटना दि.१४ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायपूर ते मूलताई अशा प्रवासात आमडी कडून पारशिवणीकडे जात असतांना पारशिवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या नयाकुंड येथील नदीवर एमएच ४० सीडी ६५५९ क्रमांकाचा मालवाहू ट्रक स्टील भरून जात असतांना अचानक ट्रकची स्टेअरिंग फ्री झाल्याने थेट मालवाहू ट्रक नयाकुंड नदीत जाऊन कोसडला. मात्र वेळेतच ट्रकचालक सुनील बरडे रा.मूलताई बैतुल यांनी ट्रकमधून फिल्मी स्टाईलने उडी घेतली.यातच चालक सुखरूप बचावल्याची माहिती आहे. घटनेची माहिती पारशिवनी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व क्रेनच्या मदतीने नदीत पडलेल्या ट्रकला बाहेर काढण्यात आले.