Monday, December 30, 2024
Homeराज्यरामटेक | पट्टेदार वाघाने केली बैलाची शिकार...

रामटेक | पट्टेदार वाघाने केली बैलाची शिकार…

रामटेक – राजू कापसे

नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात मानव आणि वन्य प्राण्यांमधील संघर्ष थांबत नसून, बुधवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान भिल्लेवाडा येथे पट्टेदार वाघाने दोन गायी आणि एका बैलाची शिकार केली, त्यात बैलाचा तडफडून मृत्यू झाला.

रामटेक तहसील अंतर्गत पवनी वन परिक्षेत्रांतर्गत सोनेघाट शिवारातील भोंदेवाडा बिट क्रमांक २७२ अंतर्गत येणाऱ्या भिल्लेवाडा गावातील शेतकरी विलास अरुण कातुरे यांच्या शेतात जनावरे बांधले होते. ज्यामध्ये पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान वाघाने बैलावर हल्ला केला, त्यात बैल गंभीर जखमी झाला, तर काही वेळाने बैलाचा मृत्यू झाला.

या वाघाने दोन गायींनाही गंभीर जखमी केल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली असून, या घटनेमुळे शेतकऱ्याचे सुमारे १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल आरएफओ ऋषिकेश पाटील यांनी तयार केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले आहे.

घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी रेवतकर यांना मोबाइल द्वारे माहिती देण्यात आली मात्र ते ट्रेनिंग वर असल्याने त्यांनी सुपरवायझर मेश्राम यांना घटनास्थळी पाठवले.मात्र जखमी झालेल्या गायींना इंजेक्शन देऊन गंभीर जखमी झालेल्या बैलाला कुठलेही इंजेक्शन न देता बैल अति गंभीर असल्याने मरणार आहे म्हणून इंजेक्शन कशाला द्यायची. असे बोलून निघून गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. जर वेळेवरच बैलाला सुद्धा उपचार मिळाले असते तर कदाचित बैल वाचला असता असे संतप्त गावकऱ्यांचे मत होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: