Sunday, December 22, 2024
Homeराज्यरामटेक | अविवाहीत पिडीतेला ६३ वर्षीय वृद्धाने केले गर्भवती...आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल...

रामटेक | अविवाहीत पिडीतेला ६३ वर्षीय वृद्धाने केले गर्भवती…आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल…

रामटेक – राजू कापसे

रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणार्‍या एका गावातील १८ वर्षीय अविवाहीत मुलीवर तालुक्यातील महादुला येथील ६३ वर्षीय वृद्धाने वारंवार जबरी लैंगिक अत्याचार केल्याने मुलीला गर्भधारणा होवुन तिला एक मुलगी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.

मनोहर सखाराम काठोके वय ६३ वर्ष, रा. महादुला ता. रामटेक असे आरोपीचे नाव असून पोलीस प्रशाषणाकडुन मिळालेल्या माहितीनुसार पिडीतीचे वय १८ वर्षे, ०५ दिवस असुन गावात तिचे आई, वडिल व लहाण भाऊ, बहीणीसह राहत होती. तिचे वर्ग १० वी चे शिक्षण तिचे दोन्ही हात व खांदा फॅक्चर झाल्याने पुढील शिक्षण तिने सोडुन दिले.

ती घरीच राहात होती. मार्च २०१८ मध्ये कपडे वाळवत असतांना ईलेक्ट्रीकचे खांबावर पडल्याने तिच्या दोन्ही हाताला व खांदयाला मार लागून दोन्ही हात फॅक्चर झाले होते तेंव्हा तिचा रामटेक येथील पाठक मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल येथे उपचार केला होता.

त्या दरम्यान फिर्यादीचे आई वडिलांनी तिला गावठी झाडपत्तिचे औषध देण्याकरिता महादुला येथील मनोहर सखाराम काठोके वय ६३ वर्ष, रा. महादुला ता. रामटेक यांना सांगीतले होते. तेंव्हा मनोहर काठोके हा डिसेंबर २०१९ पासुन रोज सकाळी पिडीतेच्या घरी येवुन तिला झाडपत्तीचा लेप लावुन दुपारी लेप लावुन झाल्यावर घरी निघुन जात होता.

झाडपत्तिचे औषधाने पिडीतेला आराम पडत असल्याने तिचा उपचार सुरूच होता. जानेवारी २०२२ मध्ये पिडीतेचे आई वडिल नेहमी प्रमाणे सकाळी ९ वाजता कामाला गेले होते. तिचे भाऊ व बहीण शाळेत गेले होते त्यादरम्यान मनोहर काठोके हा लेप लावण्या करिता घरी आला त्याने पिडीतेचे हाताला लेप लावला व तिला माझे तुझावर प्रेम आहे असे म्हणुन तिची इच्छा नसतांना तिचेवर बलात्कार केला तिचे दोन्ही हात फॅक्चर असल्याने व तिचे हाताला लेप असल्याने ति त्याला विरोध करू शकली नाही.

ती जोर जोरात ओरडत असतांना तिचे तोंड दाबुन तु कोणाला सांगशील तर तुला जिवाने मारून टाकीन अशी धमकी दिली व तिची इच्छा नसतांना तिचे सोबत वारंवार शारिरिक संबंध करित होता. पिडीत भितीमुळे कोणालाच काही सांगत नव्हती. मनोहर काठौके हा नेहमी तिचे घरी येत होता व लेप लावुन तिचेवर शारिरिक संबध करित होता.

तारीख ९ ऑगस्ट २०२३ रोजी तिचे पोटात दुखत असल्याने व तिचे घरी कोणी हजर नसल्याने तिने मनोहर काठोके याला सांगीतले. तेव्हा त्याने फिर्यादीला उपचारा करिता रिहान दवाखाना रामटेक येथे नेले असता ती ७ महीण्याची गर्भवती असल्याचे सांगीतले. त्याने पिडीतेला दुसऱ्या दिवशी वात्सल्य हॉस्पीटल रामटेक येथे नेले असता तिची दि. ११/०८/२०२३ रोजी डिलीव्हरी झाली व तिला एक मुलगी झाली आहे.

यातील फिर्यादी पिडीत मुलीसोबत आरोपी मनोहर काठौके रा. महादुला रामटेक याने तिचे इच्छे विरुध्द वारंवार शारिरिक संबंध केल्याने तिला गर्भवती करून पिडीतेने मुलीला जन्म दिला आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. रामटेक येथे आरोपीविरुध्द कलम ३७६ (२) (N). ५०६ भा.दं.. वि. बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४, ५ (एल), ५ (जे) (२), ६, ८, १२ कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यावले मॅडम पोस्टे रामटेक या करीत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: