Saturday, December 21, 2024
Homeराज्यरामटेक | २१ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण… उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू...

रामटेक | २१ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण… उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू…

  • रामटेक येथील गडमंदीर रस्त्यावरील घटना
  • वडिलांची रामटेक पोलिस स्टेशन येथे तक्रार
  • काल २५ नोव्हें. ला शोभायात्रा पहाण्यासाठी मित्रासोबत आला होता.

रामटेक – राजू कापसे

देवलापार परिसरातील सितापार येथे राहाणारा तरुणाला रामटेक येथील गडमंदीर रस्त्यावर क्षुल्लक कारणावरून बेदम मारहान केली असता गंभीर दखापत होवुन त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना नुकतीच उघडकिस आली. विवेक विश्वनाथ खोब्रागडे (२१) असे मृतक तरुनाचे नाव असुन तो आपल्या मित्रासोबत काल दि. २५ नोव्हेंबर ला रामटेक शोभायात्रा पहान्यासाठी आलेला होता.

एका धाब्यावर सिक्युरीटी चे काम करणार्‍या विवेक च्या वडीलांनी आज २६ नोव्हेंबर ला रामटेक पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार मुलगा विवेक खोब्रागडे हा शेतीचे काम करत होता. काल दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ७ वाजता दरम्यान विवेक खोब्रागडे हा त्याचा मित्र फैजान खान रा. पवनी याच्यासोबत त्याच्या मोटार सायकलने रामटेक येथे शोभायात्रेचा कार्यक्रम पाहण्याकरीता गेला होता. याचवेळी वडीलही कामावर निघुन गेले होते.

आज दिनाक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास वडील विश्वनाथ कामावरुन घरी परत आले असता घराचा दरवाजा ठोकला तेव्हा विवेक ने दरवाजा उघडला तेव्हा तो थरथर कापत होता व लंगडत चालत होता. तेव्हा वडीलांनी त्याला विचारपुस केली. तेव्हा विवेकने सांगीतले की, काल रात्री मला रामटेकला काही लोंकानी मारहान केली आहे.

तेव्हा तो बरोबर बोलत नव्हता व उभा सुध्दा होत नव्हता. तेव्हा वडीलांनी त्याला दवाखान्यात घेवुन जाण्याकरीता चार चाकी गाडी बोलाविली व विवेकला दोन तीन लोकांच्या सहाय्याने गाडीत बसवुन डाँ, सुधिर नाकले रा. पवनी यांच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले. त्यांनी चेकँप करुन त्यांनी सांगीतले की, ही सिरीयस केस आहे.

तुम्ही मुलाला कामठी येथील चौधरी हॉस्पीटल येथे उपचारासाठी घेवुन जा. तेव्हा वडील विश्वनाथ यांनी विवेकला गाडीत टाकुन उपचारासाठी कामठीला चौधरी हॉस्पीटल येथे नेले. तेव्हा गाडीमध्येच तेथील डॉक्टरांनी मुलगा विवेक याला तपासुन मृत घोषीत केले. तेव्हा वडील विश्वनाथ विवेकला घेवुन घरी परत आले.

यानंतर वडीलांनी विवेक चा मित्र फैजान खान याला सकाळी घटनेबाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, तो व विवेक हे दि. २५ नोव्हें. रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गडमंदिर रामटेक वरुन मोटार सायकलने डब्बलसिट घरी परत येण्याकरीता निघाले.

तेव्हा गड मंदिरवरुन खाली उतरत असता रत्यात आरोपी मनीष बंडुजी भारती वय 36 वर्ष रा अंबाडा त रामटेक व त्याचे मित्रांनी त्यांची मोटार सायकल थांबवुन तुमचा मोटार सायकलने माझा मोटार सायकलला ठोस मारुन तुम्ही पळुन गेले असे म्हणुन शिविगाळी करुन विवेक व फजान खान याला हातबुक्कीने व लाताबुक्कीने मारपीट केली. तसेच तुम्ही मुसलमान व महार जातीचे असल्यानंतर येथे कशाला आले, असे म्हणुन धमकी दिली.

काही वेळांनी फैजाजनचा भाऊ तेथे आल्यानंतर मनिष भारती ने त्याच्या गाडीचे नुकसान झाल्याचे सांगुन फैजानचा भावाकडुन 10,000/रु घेतले. फैजान व विवेक यांना गाडी चालवने होत नसल्याने व ते घाबरले असल्याने पोलीस स्टेशन रामटेकला तक्रार देण्यासाठी न येता दोघेही फैजानचा भावाच्या गाडीने घरी परत आले असल्याचे फैजाने माहीती देतांना सांगीतले.

त्यांच्या मारहानीमुळेच माझा मुलगा विवेक मरण पावला आहे असे वडील विश्वनाथ चे म्हणने आहे. दिलेल्या तक्रारीनुसार रामटेक पोलिसांनी अप क्र.877/23 कलम 302,341,323,504,506,34, भा द वी सह कलम 3(२)(V) अनु. जा. अनु जमाती प्रती. अधिनियम नुसार गुन्हा नोंद केलेला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रामटेक हे करत आहेत.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: