Monday, December 23, 2024
Homeराज्यरामटेक | रेल्वे नी कटुन १५ वर्षीय तरुणाचा मृत्यु...

रामटेक | रेल्वे नी कटुन १५ वर्षीय तरुणाचा मृत्यु…

रामटेक – राजु कापसे

रामटेक तालुक्यातील मनसर येथील १५ वर्षीय मुलाचा रेल्वे खाली कटुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.ही घटना रामटेक वरून इतवारी साठी जाणाऱ्या रेल्वेने ८ वाजताच्या सुमारास घडली.. माहितीनुसार, मनसर येथील १५ वर्षीय आर्यन किशोर केकते हा एकटाच आपल्या शेतात सकाळी ८ वाजताच्या सुमारास जात होता.तो स्वतःच्या सायकलने आपल्या शेताकडे निघाला होता.

सायकल रेल्वे रुळाच्या कडेला उभे करून स्वतःच्या शेतात पायदळ जाण्यासाठी निघाला असतांना रामटेक कडून इतवारी नागपूर कडे जाणाऱ्या रेल्वेने त्याला धडक दिली.व ५० फुटापर्यंत मृतदेह फरफटत गेले.यात मुलाचे डोके शरीरापासून वेगळे झाले. घटनेच्या वेळी मुलाने कानात एअरफोन लावून असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना व रामटेक पोलिसांना देण्यात आली.

रामटेक पोलीस घटनास्थळी पोहचले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करिता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले.मात्र यावेळी रेल्वे पोलिसांना माहिती देऊनसुद्धा रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले नाही असे गावकऱ्यांनी सांगितले.या घटनेने पुन्हा एकदा रेल्वे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण मनसर परिसर हळहळ व्यक्त करीत आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: