रामटेक: आदर्श विद्यालय रामटेक येथे 26 स्पटेंबरला गणेश मुर्ती बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. यात 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून माती, क्ले पासून मुर्ती तयार केल्या. परीक्षण राहुल जोहरे, अशोक हटवार, सरोज पेटकर यांनी केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेश मुर्तीची प्रदर्शनी अठराभुजा गणेश मंदिर येथे ठेवण्यात झाली.
प्रदर्शनीला प्रामुख्याने माजी मंत्री राजेन्द्र मुळक, एसडीओ वंदना सवरंगपते, एसडीपीओ आशित कांबले, मुख्याधिकारी पल्लवी राऊत, ठाणेदार हृदयनारायण यादव, हुकुमचंद बडवाईक, रुषी किमतकर, रीतेश चौकसे, साहित मंदिरात येणा-या भाविकांनी प्रदर्शनीला भेट दिली व विद्यार्थी यांचे कौतुक केले.
स्पर्धा यशस्वीते करीता प्राचार्ण राजू बर्वे यांच्या मार्गदर्शनात सुनील सेलोकर, अशोक खंडाईत, अरविंद कोहळे रितेश मैंद, वेदप्रकाश मोकदम सहित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यानी परिश्रम केले।