Monday, December 23, 2024
Homeराज्यरामटेक | किट्स मध्ये ३३ वे वार्षिक सम्मेलन संपन्न...

रामटेक | किट्स मध्ये ३३ वे वार्षिक सम्मेलन संपन्न…

रामटेक – राजू कापसे

कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायंस (किटस) रामटेक मध्ये 33 वे वार्षिक सम्मेलन किट्सच्या सील्हर जुबेली सभागृह येथे 4 मार्चला संपन्न झाले.

कार्यक्रमाचे उद्घाटन खनिज भवन नागपूर चे महाराष्ट्र भूगर्भ व खनिज संचालनालय चे महासंचालक डॉ. टीआरके राव यांचे हस्ते झाले.

कार्यक्रमाची अध्यक्षता वोडीथला शिक्षण संस्था हैदराबादचे सचिव व्ही. श्रीनिवासराव यानी केली. या वेळी प्रामुख्याने, संस्थेचे व्ही. किशनराव, व्ही. प्रणव, प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, समन्वयक डॉ. पंकज आस्टनकर , डॉ. विलास महात्मे, विद्यार्थी प्रतिनिधी रामु गोलापुडी , पालक, डीन, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. टीआरके राव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की भविष्याच्या दृष्टीकोन ठेवून भारतरत्न पी.व्ही. नरसिंहराव यांनी रामटेक परिसरात व्यवसायिक शिक्षणा करिता संस्था अध्यक्ष राजेश्वर राव यांचा माध्यमातुन किट्सची स्थापना केली.

किट्स विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणा व्यतिरीक्त एकाच छताखाली सर्व सुविधा मिळत आहेत. येथिल विद्यार्थी जगभर चांगल्या पदावर उत्कृष्ट काम करीत आहेत ही समाधानाची बाब आहे.

ते म्हणाले की भारतात युवा शक्ती भरपूर आहे. भारत हे लवकरच तीसरी आर्थिक महासत्ता बनेल. जगात स्टार्टअप मध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर असून 80 हजारावर संशोधन चालू आहेत. मोठया प्रमाणात सर्वच क्षेत्रात पायाभूत सुविधांचे काम चालू आहेत. युवकांना रोजगारांचा भरपूर संधी आहेत. युवकानी स्पर्धा परिक्षाला समोरे जावे असे ते म्हणाले.

संस्था सचिव व्ही. श्रीनिवासराव म्हणाले की विद्यार्थ्याच्या सर्वांगींग विकासाकरीता संस्था सुविधा देत आहे. पर्यावरण पुरक सौर उर्जाच्या वापर परिसरात करण्यात आला आहे।

प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले संस्था लवकरच ऑटोनॉमस होईल। त्यानी वर्षभर विद्यार्थ्या करिता राबविलेले विविध उपकर्माची माहिती दिली.

हयावेळी 94 गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार करुन त्यांना पदक, प्रमाणपत्र व रोख पुरस्कार देण्यात आले. डॉ. पंकज आस्टनकर यानी अथितिचा परिचय करून दिला. संचालन प्रा. राशि श्रीगड़ीवार, श्रावणी चकिनारपूवार, सागर जीवने यानी तर आभार प्रा. अंजली नरड यानी केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: