महिला व बालकल्याण विभागाचा अभिनव उपक्रम…शेकडो रानभाज्यांबाबत मिळाली माहिती
राजु कापसे
रामटेक
स्थानिक महिला व बालकल्याण विभाग, रामटेक तर्फे काल दि. ८ ऑगस्ट ला दुपारी १२ वाजता दरम्यान शहराला लागुनच असलेल्या शितलवाडी टी पॉईंट येथे रानभाज्या महोत्सवाचे थाटात आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाने नागरीकांचे लक्ष वेधुन टाकले होते हे येथे विशेष.
दरम्यान महीला व बालकल्याण अधिकारी संगीता चंद्रीकापुरे यांनी आपल्या सुपरवायजर तथा अंगणवाडी सेविकांसह येथे शेकडो प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावुन त्याबाबद उपस्थित नागरिकांना त्या रानभाज्यांचे महत्व पटवुन देत माहीती प्रदान केली. सध्यास्थितीमध्ये नागरीकांच्या जेवनात फास्ट फुड तथा बेकरीच्या पदार्थांचे सेवन फार मोठ्या प्रमाणात वाढलेले असुन त्याचा माणवाच्या शरीरावर फार मोठ्या प्रमाणात घातक परीणाम होत असल्याचे यावेळी सी.डी.पी.ओ. संगीता चंद्रीकापुरे यांचेसह खैरी बिजेवाडा ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ. उर्मीला जगदीश खुडसाव यांनी उपस्थित नागरीकांना माहिती देतांना सांगीतले.
दरम्यान यावेळी लावण्यात आलेल्या पालेभाज्यांच्या स्टॉलमध्ये हिरवी पोईन, आंबाडी भाजी, इंग्रजी धोपा, ॲलोवेरा यांचेसह शेकडो रानभाज्या होत्या. यावेळी उपस्थितांमध्ये सी.डी.पी.ओ. संगीता चंद्रीकापुरे, बि.डी.ओ. जयसींग जाधव, सरपंचा सौ. उर्मिला जगदीश खुडसाव, प्रशांत जांभुळकर, आशिष भोगे, अंगणवाडी सेविका अनुपमा बिसने, अर्चना वाडीभस्मे, जोत्सना कोटांगले यांचेसह शेकडो नागरीक उपस्थीत होते.