रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )
कौशल्य आणि हस्तकला निगडित विश्वकर्मा दिनी रामटेक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. गुणवंत सर्व प्रशिक्षनार्थीना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अथिति म्हणुन महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे प्राचार्य श्री धीरज यादव व् श्री राजेश राठोड, समतादुत, तालुका रामटेक (बार्टी) पुणे, गटनिदेशक एस. अमीन, गटनिदेशक अमित शिंदे व् आदि मान्यवर मंचकावर उपस्थित होते. रामटेक आईटीआई येथील गुणवंत प्रशिक्षनार्थी यांना प्रमाणपत्र व् स्मुर्ती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
रामटेक आईटीआई येथील तारतंत्री शाखेतील प्रतिक नितनवरे याने 95% गुण प्राप्त करीत रामटेक आईटीआई मध्ये प्रथम आला, तर विजतंत्री ट्रेडमध्ये रौशनी संजय रोडगे 88.50%, जोडारी ट्रेडमध्ये तेजस अजय कोटांगले 85.83%, यांत्रिकी मोटरगाड़ी ट्रेडमध्ये भूषण धर्मानंद गजघाटे 90%, कातारी ट्रेडमध्ये निशा पवन चौधरी 88.16%, यांत्रिक डीझल ट्रेडमध्ये तुषार लालिराम तुरणकर 92.33%, संधाता ट्रेडमध्ये सुमित रत्नाकर पौनिकर 84.33% व् फॅशन टेक्नोलॉजी या ट्रेडमधील सोनम नथुजी मुगरी 86% मिळवित् गुणवत्ता यादीत प्रथम स्थान पटकाविले आहे. संचालन रोशनी गजभिये यांनी केले, माधुरी मेश्राम यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिल्प निदेशक संदीप कोटांगले, आर.जे. साठवने, आर.एस. खोब्रागडे, मदनकर सर, पि.एम्.बावने, एस. डब्लू दुधबळे, कृणाल पाटिल, दिपक मिरगे, पवन पाटिल, प्रशांत बावनकर, नितेश देशभ्रतार, सचिन शेंडे तथा अन्य कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.