- ग्रामपंचायत च्या मागणीला दिला मदतीचा हात…
- चंद्रपाल चौकसे यांचा पुढाकार…
- विविध राजकिय तथा पदाधिकाऱ्यांची हजेरी…
रामटेक – राजु कापसे
रामटेक – मनसर मार्गावरील ग्रामपंचायत खैरी बिजेवाडा प्रशाषणाने लॉयन्स क्लब ऑफ नागपुर लिजेंट ला शवपेटी ची मागणी केलेली होती. त्यानुसार दि. ४ जुन ला शवपेटी भेट देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामपंचायतीच्या मागणीला उचलुन धरणारे तथा लॉयन्स क्लब चे सदस्य असलेले पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचेसह लॉयन्स क्लब चे सदस्य व विविध राजकिय तथा नागरीक उपस्थित होते.
नागरिकांच्या घरी कुणाचा मृत्यु झाल्यास व नातेवाईक यायला उशीर असल्यास तेव्हापर्यंत तो मृतदेह कसा व कुठे ठेवावा असा प्रश्न कायम होता. तेव्हा ही समस्या हेरून ग्रा.पं. खैरी बिजेवाडा च्या सरपंच सौ. उर्मिला जगदिश खुडसाव व सदस्यांनी सदर बाब पर्यटक मित्र तथा लॉयन्स क्लब चे सदस्य असलेले चंद्रपाल चौकसे यांचेपुढे ठेवली.
चौकसे यांनी सदर बाब उचलुन धरत लॉयन्स क्लब च्या वतीने दिनांक ४ जुन रोज रविवारला सकाळी १० च्या सुमारास खैरी बिजेवाडा ग्रा.पं. सदर शित शवपेटी भेट म्हणुन दिली. यावेळी उपस्थितांमध्ये लॉयन्स क्लब ऑफ नागपुर लिजेंड चे सदस्य व पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचेसह लॉयन्स क्लब चे श्रवण कुमार , विनायकजी केवटकर,
सौ. पल्लवी वंजारी , श्री. सुनिल भगत, श्री. राजू खंडेलवार, क्षीतीजा कालेकर, हरीष कालेकर, मयुरेश कार्तायन, अंजन विस्वास, आचीभ खेमानी, शितल वंजारी, पं.स. माजी उपसभापती गज्जु यादव,
सरपंच उर्मिला खुडसाव, राजेश जयस्वाल, ग्रा.पं. सदस्य सुरेंद्र सांगोडे, अल्का जांभुळकर, नितीन बंडीवार, सचिन यादव, वनीता मेश्राम, बब्बा यादव, सह आदी नागरीक उपस्थीत होते.