Sunday, December 22, 2024
Homeराज्यशेतकऱ्यांची सर्रास लूट...शासनाच्या आदेशाला बगल...एक रुपयाच्या पीक विम्यासाठी २०० खर्च...

शेतकऱ्यांची सर्रास लूट…शासनाच्या आदेशाला बगल…एक रुपयाच्या पीक विम्यासाठी २०० खर्च…

अकोला – अमोल साबळे

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने एक रुपयात पीक विमा काढण्यासाठीची योजन अंमलात आणली आहे असे असतानाही काही सीएससी केंद्रचालकांमार्फत शेतकऱ्यांकडून २०० उकळले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे

यंदा शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर बैंक, विमा कंपनी प्रतिनिधी, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) मार्फत योजनेच्या सहभागाची ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. काही सीएससी केंद्र चालकांमार्फत १ रुपयाच्या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे उकळले जात असल्याचे वास्तव आहे.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळिराजाला १ रुपयाच्या पीक विम्यासाठी २०० रुपये खर्च येत आहे. पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम ४० रुपये देण्यात येत आहेत.

असे ‘त्या’ सीएससी केंद्रधारकावर होणार कारवाई.

शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जात असेल तर त्या सीएससी केंद्रधारकावर तत्काळ कारवाई करा, अशा सूचना कृषी आयुक्तालयामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकायांना मिळाल्या आहेत, तसेच सामूहिक सेवा केंद्राची नियमित तपासणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल.

असतानाही शासनाच्या आदेशाला बगल देत शेतकऱ्यांकडून सातबारा आठ-अ, झेरॉक्स आदींच्या आहे. माध्यमातून अतिरिक्त पैसे उकळले जात असल्याचे चित्र आहे.

खरीप हंगाम २०१३-२४ मध्ये पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. सर्वसमावेशक पीक विमा योजनेच्या अनुषंगाने शेतकरी हिश्श्याचा विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरणा करून पीक विमा योजनेच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी

सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) धारकाकडून पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास तालुका कृषी अधिकारी, एसएओ कार्यालयात संपर्क करावा. तत्काळ कारवाई करण्यात येईल.

शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला. लागणार आहे. असे असतानाही जिल्ह्यात बळिराजाची सर्रास लूट सुरू १ रुपया भरून पीक विम्याची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति अर्ज २०० रुपये खर्च येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शासनाची योजना काय कामाची, अशी प्रतिक्रियासुद्धा शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

दुसरीकडे शेतकऱ्याचे गावातील सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) धारकाशी मधुर संबंध असल्याने व प्रसंगी ऑनलाइनचे काम त्वरित करीत असल्याने शेतकरीसुद्धा लूट सहन करीत असल्याचे वास्तव आहे.

पेरणीचे नियोजन जिल्ह्यात यंदा ४,६९,६०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे नियोजन गतवर्षी पीक विमा योजनेचा तपशील शेतकरी सहभाग ३,२०,९४१ विमा संरक्षित क्षेत्र २,६५,१२१ हेक्टर ३१ जुलै अंतिम मुदत सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस व ज्वारी आदी पिकांसाठी शेतकयांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दि. ३१ जुलै २०२३ आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: