रामटेक – राजु कापसे
तहसिल कार्यालय रामटेक येथुन तहसिलदार हंसा मोहने यांची नुकतीच बदली झाली. त्यांनी आपल्या कार्यकाळात उत्तमरित्या कार्यभार सांभाळला. आता रामटेक तहसिलदारपदी रमेश कोळपे यांची नियुक्ती झालेली असुन त्यांनी नुकताच ५ फेब्रुवारी रोजी रामटेक येथे तहसिलदार पदाचा कार्यभार सांभाळला.
तहसिलदार रमेश कोळपे हे यापुर्वी वर्धा तहसिल कार्यालय येथे तहसिलदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी तेथे ३ वर्षे सेवा दिली. रामटेक तहसिलदार पदाचा कार्यभार सांभाळताच त्यांनी आपल्या कार्यक्षेत्राची पहाणी तथा दौरे सुरु केलेले आहे.
विशेषतः नुकताच झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागातील नुकसानीची पहानी त्यांनी केली. तसेच आगामी काळात निवडणुका येणार असुन त्या कामातही सध्या मी व्यस्त असल्याचे यावेळी माहिती देतांना तहसिलदार रमेश कोळपे यांनी सांगितले.