Monday, December 23, 2024
Homeराज्यरामधाम (तीर्थ) मनसर येथे श्री. चंद्रपाल चौकसे पर्यटक मित्र, रामटेक को -...

रामधाम (तीर्थ) मनसर येथे श्री. चंद्रपाल चौकसे पर्यटक मित्र, रामटेक को – ऑपरेटिव्ह कृषी उद्योग रामटेक तर्फे तांत्रिक प्रशिक्षण शिबीर…

रामटेक – राजु कापसे

दिनांक 27/07/2024 रोज शनिवारला रामधाम (तीर्थ) मनसर येथे श्री. चंद्रपाल चौकसे पर्यटक मित्र, रामटेक को -ऑपरेटिव्ह कृषी उद्योग रामटेक तर्फे महिला बचत गट सशक्तिकरण अभियान अंतर्गत आर्थिक विकासाकरिता तांत्रिक प्रशिक्षण शिबीर मार्फत मा. पार्वती सभागृह, रामधाम तीर्थ मनसर येथे एक दिवशीय शीबीर घेण्यात आले.

या शिबिराचे उदघाटन रामधामचे संस्थापक श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य / पर्यटक मित्र रामटेक) व सौ. संध्याताई चंद्रपालजी चौकसे (संस्थापिका रामधाम तीर्थ मनसर) यांचा हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणात विविध प्रकारचे लोणचं बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी सौ भारती गायकवाड MAVIM ब्लॉक manegar यांनी महिलाना उद्योग विषयी सविस्तर माहिती दिली. या प्रशिक्षणात 400 ते 500 महिलांची उपस्थिती होती. बचत गटाच्या महिलांनी रोजगार प्राप्त होण्याकरिता उत्सुकतेणे प्रशिक्षणात सहभागी झाल्या. रामटेक को ऑपरेटिव्ह कृषी उद्योग मार्फत महिलांना सशक्त बनविण्यासाठी महिला बचत गटांना व युवक व युवतीना कुटीर उद्योग स्थापित करून रोजगाराची संधी प्राप्त करून देऊन दैनंदिन उपयोगाचे पदार्थ बनविण्याकरिता मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मित करण्यात येईल, कुटीर उद्योग सुरु करण्याकरिता आर्थिक सवलती बाबत मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येईल.

इच्छुक बचत गटांना उद्योग सुरु करण्याकरिता उद्योग सामग्री संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, बचत गटाच्या योगेतेनुसार बचत गटांना उद्योग सुरु करण्यासाठी उद्योग सामग्री निशुल्क देण्यात येईल,( महिला बचत गट द्वारा निर्मित वस्तुंना नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक व इतर महानगर येथे विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल असे मत श्री. चंद्रपाल चौकसे यांनी मांडले) या शिबिरात सौ. जयश्री खोब्रागडे यांनी महिलांना लोणचं बनविण्याकरिता कुठली सामग्री लागते आणि दर्जेदार चव कशी लागणार आणि ते मार्केट मध्ये कसा विकला जाईल या विषयी माहिती दिली. यावेळी सौ. भारती गायकवाड ( ब्लॉक मॅनेजर मावीम), श्री. ललित चामट (उपजीविका सल्लागार मावीम), श्री. नितीन खराबे (उपजीविका सल्लागार मावीम) सौ. दिपाताई चव्हाण व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: