राज्यात छत्रपती शिवरायांचा मुद्दा ताजा असतांना आता नव्याने एक वाद समोर येतोय, पतंजलीचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. ठाण्यात पतंजलीच्या मोफत योग शिबिरात बोलत असताना बाबा रामदेव म्हणाले की, ‘महिला साडीमध्ये छान दिसतात, सलवार-सुटमध्येही छान दिसतात. आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही घातले नाही तरी छान दिसतात.
विशेष म्हणजे, बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केले, तेव्हा मंचावर त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदें उपस्थित होते. आता रामदेव बाबांच्या या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावर राष्ट्रवादीच्या आक्रमक महिला नेत्या रुपाली पाटील यांनी अमृता फडणवीसांना संबोधून म्हणाल्या की, बाबा रामदेवांच्या सन्नदिशी कानाखाली ओढली पाहिजे होती…असे रुपाली पाटील वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
यावेळी बाबा रामदेव यांनी अमृता फडणवीस यांचे कौतुक केले. अमृता फडणवीस हिशोबात अन्न ग्रहण करतात. पुढील शंभर वर्षे त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. याचे कारण म्हणजे, त्या नेहमी आनंदी राहतात, असं बाबा रामदेव म्हणाले. तसेच, जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर असतो, तसाच आनंद मला तुमच्या(उपस्थित महिला) चेहऱ्यावर पाहायचा आहे, असंही ते म्हणाले.
पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन शुक्रवारी ठाण्यातील हायलँड भागात करण्यात आले होते. या संमेलनास अमृता फडणवीस उपस्थित होत्या.