Ramayan : 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा झाल्यानंतर प्रत्येक भक्त त्यांच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वात जास्त पाहिलेली धार्मिक मालिका रामायण डीडी नॅशनलवर प्रसारित होणार आहे. रामानंद सागर यांच्या रामायणाबद्दल बोलत आहोत, ज्याचे प्रसारण जाहीर झाले आहे.
1987 मध्ये पहिल्यांदा टीव्हीवर आलेल्या रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ने सगळीकडे खळबळ उडवून दिली होती. रामायानासाठी कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असू द्याला त्याला रामायण खूप आवडायचं. मागील दोन वर्षाआधी कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन असतानाही तेव्हा परत रामायण टीव्हीवर परतले आणि सर्वाधिक पाहिला जाणारा शो बनले. आता पुन्हा रामायण एकदा छोट्या पडद्यावर येत आहे.
दूरदर्शनने त्याच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर घोषणा केली की रामानंद सागर यांचा ‘रामायण’ पुन्हा टेलिव्हिजन पडद्यावर येणार आहे. एक छोटी क्लिप शेअर करत, ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, रिपु रन जीति सुजस सुर गावत। सीता सहित अनुज प्रभु आवत॥ प्रभू श्रीराम आले! भारतातील सर्वात लोकप्रिय शो ‘रामायण’ पुन्हा एकदा परतला आहे. रामानंद सागर यांचे रामायण पुन्हा एकदा #DDNational वर, लवकरच पहा! यासह त्याने अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी यांना टॅग केले.
रिपु रन जीति सुजस सुर गावत।
— Doordarshan National दूरदर्शन नेशनल (@DDNational) January 31, 2024
सीता सहित अनुज प्रभु आवत॥
आ गए हैं प्रभु श्री राम! एक बार फिर वापस आ गया है पूरे भारत का सबसे लोकप्रिय शो 'रामायण'। रामानंद सागर की रामायण एक बार फिर #DDNational पर, जल्द देखिए!#Ramayan | @arungovil12 | @ChikhliaDipika | @LahriSunil pic.twitter.com/W8PU5V7wVH
प्रसारित झाल्याची बातमी ऐकून चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या. एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, ‘खूप चांगला निर्णय. माझीही एक मागणी होती जी तुम्ही पूर्ण करत आहात. कृपया प्रसारणाची वेळ आणि तारीख सांगा. एकजण म्हणाला, ‘हे रामायण अगणित वेळा बघता येईल.’ तर काहींनी ‘जय श्री राम’ लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.