सोहळ्याला तालुक्यातील हजारो नागरीकांची हजेरी…
डिगी मैदान येथे दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम संपन्न…
रामटेक – राजु कापसे
संपूर्ण विदर्भात विजयादशमीच्या दिवशी रावणवध करताना रावणाला जाळण्यात येते परंतु श्रीरामाचे पाय लागलेल्या या रामनगरीमध्ये पारंपारिक पद्धतीनुसार रावणाचा वध केला जातो. यासाठी प्रख्यात श्रीराम गडमंदीर येथील श्रीराम मंदिरातील ऐतिहासिक ‘ निशाण ‘ ने रावनाचा वध केला जातो हे विशेष. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या भव्य सोहळ्याला पाहण्यासाठी तालुक्यातील हजारो नागरिक येथे एकच गर्दी केली होती.
दि. १२ ऑक्टोबर रोज शनिवार ला पारंपरिक प्रथेनुसार रामटेक गड मंदिरातील निशाण ची विधीवत पूजा केली गेली. दुपारी ५ वाजून ५ मिनीटांदरम्यान हे निशान घेऊन गडमंदीर येथील राम मंदिरातील पुजारी मोहन पंडे , मंगेश पंडे तसेच लक्ष्मण मंदिरातील पुजारी राम पंडे , अविनाश पंडे , धनंजय पंडे , संजय पंडे व अक्षय पंडे हे मानापुर येथील डिगी मैदानाकडे रावण वधासाठी निघाले.
यादरम्यान निशाणासह पुजाऱ्यांना भोसला देवस्थान चे रिसीव्हर तथा उपाविभागीय अधिकारी ( महसुल ) प्रियेश महाजन यांचे मार्गदर्शनात निरीक्षक अधिकारी चंद्रशेखर बावनकर यांचे नेतृत्वात सुरक्षा रक्षक कुणाल बिसमोगरे , गुलाब नागपुरे , मंगेश बिसणे , निलेश महाजन , तेजराम नागपुरे , शेखर आनंदेवार यांनी कडेकोट सुरक्षा प्रदान केली होती.
दरम्यान गडमंदीर ते डिगी मैदानादरम्यानच्या मार्गातील घराघरातील नागरीकांनी या निशाणावर पुष्पवर्षाव करून स्वागत केले. ज्या मार्गावरून निशान जाणार असते त्या मार्गावरील घरांतील महिलांनी रस्त्यावर सडा टाकुन रांगोळी काढलेली होती. यावेळी राम , सिता , लक्ष्मण , हनुमान चे पात्र असलेली झाकी सुद्धा काढण्यात आली होती.
दांडपट्टा फिरवित काही तरुण डिगी मैदानाकडे जात होते. हे रावणवधाचे ‘ निशाण ‘ रामटेक जवळील मानापुर गावातील डीगी मैदानात पोहोचल्या नंतर सूर्यास्ताअगोदर रावणवध करण्यात आला. डिगी मैदानावरील संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रण ड्रोण कॅमेऱ्याद्वारे करण्यात आले. प्रसिद्ध रावण वधाला उपस्थित राहून रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांनी रामटेक व परिसरातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी भोसला देवस्थानचे रिसीवर तथा उपविभागीय अधिकारी महसूल प्रियेश महाजन , उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलिस निरीक्षक आसाराम शेटे, नायब तहसिलदार भोजराज बडवाईक , मानापुर ग्रामपंचायतचे सरपंच संदीप सावरकर, उपसरपंच भारत अडकणे , गडमंदिर येथील राम मंदीर मधील पुजारी मोहन पंडे, मुलगा मंगेश पंडे ,
लक्ष्मण मंदिर मधील अविनाश पंडे, राम पंडे, धनंजय पंडे, संजय पंडे, अक्षय पंडे, गडमंदीर चे निरीक्षक अधिकारी चंद्रशेखर बावनकर यांचेसह सुरक्षा रक्षक तसेच विविध राजकिय पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरासह ग्रामीण भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.