Monday, December 23, 2024
Homeराज्यरामभक्त चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले गडमंदिर येथे प्रभू श्रीरामाचे दर्शन...

रामभक्त चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले गडमंदिर येथे प्रभू श्रीरामाचे दर्शन…

रामटेक – राजू कापसे

अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हस्ते पार पडला,संपूर्ण देश राममय झाले असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील अयोध्या म्हणून ओळख असलेल्या रामटेक येथील गडमंदिरावर जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले व आरती केली.

मनसर येथे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी श्रीराम जानकी मंदिर येथे चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत केले.संपूर्ण भक्तिमय वातावरणात श्रीरामाच्या नाऱ्यानी गडमंदीर परिसर दुमदुमले होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी नेहरू मैदान येथे सुरू असलेल्या संस्कृती महोत्सव येथे सुरू असलेल्या सिंधुरागिरी महानाट्यला भेट दिली,महानाट्य कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी वंदना सौरांगपते यांनी पुष्पगुच्छ देवून बावनकुळे यांचे स्वागत केले.
प्रामुख्याने माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी,आमदार आशीष जयस्वाल,माजी आमदार आनदराव देशमुख,माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख,योगेश वाडीभस्मे,राहुल किरपान,संजय मुलमुले,उमेश पटले,नंदकिशोर कोहळे,निलेश हटवार,

सुरेंद्र बुधे,सचिन यादव,रणवीर वाघमारे,जयराम मेहरकुळे,आलोक मानकर,संजय बिसमोगरे,उमेश रनदिवे,विशाल भुते सह आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: