रामटेक – राजू कापसे
भारतीय संस्कृती मध्ये दरवर्षीप्रमाणे राखी बहिण भावाला बांधत असते परंतू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवनी त. रामटेक जि.नागपूर येथील शाळेतील पहिली ते चौथीच्या सर्व मुलींनी राखी भावाला बांधून बहिणीने भावाला बांधायचं प्रथा मोडली आहे.वास्तविक सध्याच्या काळात या 21 व्या शतकात पूर्वीपेक्षा होत असलेले अत्याचार,बलात्कार, छळ या सर्व गोष्टींचा विचार करून बहिणीने सुद्धा भावाची जबाबदारी समजून मदत,रक्षण करण्याचा कारण मुलगा वसा घेवून जिथे मुलीनं कमी समजले जाते तिथे आज प्रत्येक गोष्ट मुलगी करत आहे.
मुलगा,मुलगी हे दोन्ही समान आहेत म्हणून कोणत्याही एका घटकाला दुजाभाव न करता हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजून त्यात विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा.याकरिता हा उपक्रम दरवर्षी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राबविला जातो. अशा प्रकारे हा उपक्रम राबविणारे ही महाराष्ट्रातील ही पहिली जि.प.शाळा ठरली.संपूर्ण महाराष्ट्रात या उपक्रमाचा कौतुक केलं जात आहे.
“पूर्वी पासून परंपरेने चालत आलेल्या पुरुषसत्ताक संस्कृतीला फाट्यावर मारून विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन समतेची सृजनशील नवविचारांची क्षमता निर्माण व्हावी याकरिता हा नवीन उपक्रम जि.प.शाळेमध्ये राबवण्यात आला.” – निलेश नन्नावरे (मुख्याध्यापक जि. प. प्राथ.शाळा शिवणी)