Monday, September 16, 2024
Homeराज्यराष्ट्रीय आदर्श विद्यालय येथे राखी प्रदर्शनी विद्यार्थी यानी स्वतः तयार केल्या...

राष्ट्रीय आदर्श विद्यालय येथे राखी प्रदर्शनी विद्यार्थी यानी स्वतः तयार केल्या…

रामटेक – राजू कापसे

राष्ट्रीय आदर्श विद्यालय येथे विद्यार्थ्यांनी स्वत तयार केलेल्या राखीचे प्रदर्शन 17 ऑगस्टला ठेवण्यात आले होते. यात 110 विद्यार्थी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. 6 विद्यार्थाना उत्कृष्ट राखी बद्दल स्मृतीचिन्ह देण्यात आले.

स्मृती चिन्ह स्व. स्वातंत्रता सेनानी गंगाधर जोशी सोलापूर यांचा स्मृती प्रीत्यर्थ देण्यात आले. यावेळी समाज सेवक रवीकांत जोशी, संस्था संचालक होमराज हजारे, मुखअधापक राजू बर्वे, पत्रकार नत्थू घरजाळे उपास्थित होते: राहुल जोहरे व सुनंदा जांभूळकर यांनी निरिक्षण केले.

मुख्याधापक राजू बर्वे मार्गदर्शन करतांना म्हणाले की विविध्य प्रदर्शनी आयोजीत केल्याने विद्यार्थाच्या सुप्त गुणांना वाव मिळतो । राखी प्रदर्शनी आयोजना करीता अशोक खंडाइत,अरविंद कोहळे संगीता नागोसे यांनी प्रयत्न केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: