न्युज डेस्क – राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांच्या कानपुरिया स्टाईलने बॉलिवूडसोबतच छोट्या पडद्यावरही धमाल केली. स्टँड अप कॉमेडी शो लाफ्टर चॅलेंजमध्ये उपविजेतेपद मिळवून त्यांनी आपली वेगळी ओळख मिळविली. या शोच्या माध्यमातून राजू करोडो लोकांच्या घरात पोहचले.
राजू छोट्या पडद्याच्या दुनियेत रमून गेला. येथूनच राजू आणि त्याचे पात्र गजोधर घरोघरी लोकप्रिय झाले. 1993 पासून चित्रपट जगताशी जोडलेले राजू मुंबईतील कलाकारांसोबत देश-विदेशात शो करत होते. त्यांच्या कानपुरिया शैलीचे स्टेज शोमध्येही खूप कौतुक झाले.
राजू श्रीवास्तव यांनी अनिल कपूरच्या तेजाबमधून बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. बाजीगर, आमदनी अट्ठनी खर्च रुपैया, मैं प्रेम की दीवानी हूं आणि कैदी यांसारख्या चित्रपटात काम केले. राजूने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या भूमिका केल्या.
विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचे अकाली निधन अतिशय दुःखद; एक चांगला कलाकार गमावला – अशोकराव चव्हाण…
सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ या सुपरहिट चित्रपटात त्यांनी ट्रक क्लीनरची भूमिका साकारली होती. जर्नी बॉम्बे टू गोवा, द ब्रदर्स यांसारख्या काही चित्रपटांमध्ये तो विनोदी कलाकार म्हणून दिसले. नंतर राजू मिस्टर आझाद, अभय, विद्यार्थी, जहाँ जायेगा हमसे पायेगा, फीलिंग्स ऑफ अंडरस्टँडिंग, गनपावडर आणि टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटातही दिसले.
राजूने 1994 मध्ये आलेल्या ‘देख भाई देख’ या सुपरहिट कॉमेडी शोमधून छोट्या पडद्यावर प्रवेश केला. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँड-अप कॉमेडी शोच्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेतल्यानंतर राजू श्रीवास्तव प्रसिद्धीस आला. यानंतर राजूने मागे वळून पाहिले नाही.
शक्तीमान, बिग बास, कॉमेडी का महामुकाबला, कॉमेडी सर्कस, कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोमध्ये वर्चस्व गाजवले. बिग बॉस 3 या टीव्ही शोमध्ये तो सहभागी झाले. दोन महिने बिगबॉस च्या घरात राहिल्याने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. 2013 मध्ये राजूने पत्नीसह नच बलिए सीझन 6 मध्ये भाग घेतला होता. याशिवाय शक्तीमान, राजू हाजीर हो, कॉमेडी सर्कस, कॉमेडी का महामुकाबला, लाफ इंडिया लाफ, गँग्स ऑफ हंसीपूर आणि अदालत हे राजूच्या करिअरमधील मैलाचे दगड ठरले.