Thursday, September 19, 2024
Homeराज्यराजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी...

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी…

दानापूर – गोपाल विरघट

दानापूर येथील वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अस्थी स्मारक मंदिर येथे प्रेस क्लब दानापूर व श्री गुरुदेव सेवा मंडळ दानापूर वतीने दिनांक १२ जानेवारी ला गुरुदेव सेवा मंडळाचे श्री रामचंद्र वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली व श्री गुरुदेव सेवा मंडळाचे विभागीय सचिव माणिकराव इंगळे गुरुजी, व जेष्ठ पत्रकार प्रमोद हागे यांची प्रमुख उपस्थितीत राजमाता जिजाऊ यांची ४२६वी, व स्वामी विवेकानंद यांची १६१ वी जयंती साजरी करण्यात आली.

सर्व प्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले .यावेळी अ भा.श्री गुरुदेव सेवा मंडळाचे विभागीय सचिव इंगळे गुरुजी, पत्रकार संजय हागे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी आपले विचार वेक्त केले.

यावेळी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष शेख राजू पत्रकार रविंद्र ढाकरे, नंदकिशोर नागपूरे, सखाराम नटकुट, योगेश अटराळे श्री गुरुदेव सेवा मंडळाचे बाळुभाऊ बावणे, संतोष वाघमारे, गणेश दांदळे, श्रीकृष्ण डाबेराव बाळाभाऊ घायल, मोहन हागे, आदी उपस्थिती होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव रौंदळे व आभार प्रदर्शन संजय हागे यांनी केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: