सांगली – ज्योती मोरे
“युद्धात पतीचे निधन, वृद्धापकाळाने सासऱ्यांचे निधन, स्वतच्या पुत्राचे अकाली निधन होऊन देखील राजमाता अहिल्यादेवीनी राज्यकारभारावर आपली पकड घट्ट ठेवली होती. कौटुंबिक दु:खामुळे हतबल न होता आपली प्रजा हेच आपले कुटुंब समजून अतिशय धैर्याने त्यांनी होळकर साम्राज्याला आदर्श राज्य ठरविले.
राजमाता अहिल्यादेवी ह्या त्यामुळे अलौकिक राज्यकर्त्या ठरतात. भारतातील धर्मस्थळांचा जीर्णोद्धार जितका पू. अहिल्यादेवींनी केला तितका अन्य संस्थानिकांना जमला नाही. यासाठी आजही आपणासाठी राजमाता अहिल्यादेवी आदर्शवत आहेत.
” असे विचार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पू. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार जनसंपर्क कार्यालयात प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी माजी आमदार नितीनराजे शिंदे, संघटन सरचिटणीस दीपक माने, ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बिरजे,
प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, नगरसेवक संजय कुलकर्णी, दरीबा बंडगर, श्रीकांत वाघमोडे, अमर पडळकर, अमित गडदे, चेतन माडगूळकर, गौस पठाण, गणपती साळुंखे, संभाजी सरगर आदी मान्यवर व उपस्थित होते.