Rajkot Fire : गुजरातमधील राजकोट शहरातील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत चार मुलांसह 27 जणांचा मृत्यू झाला. गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राजकोट पोलिसांनी सांगितले की, अपघातानंतर ‘गेम झोन’चा मालक आणि व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.
तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीचे प्रमुख सुभाष त्रिवेदी यांनी गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सांगितले की, हा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. कोणत्या विभागाने काय केले, याचा सखोल तपास एसआयटी करणार आहे. अपघाताला जबाबदार कोण, कोणत्या चुका झाल्या, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहेत? अशा सर्व प्रश्नांवर विचारमंथन करून तपास केला जाईल.
मृतांमध्ये 12 वर्षाखालील 4 मुलांचा समावेश आहे.
शनिवारी संध्याकाळी राजकोटच्या TRP ‘गेम झोन’ मध्ये लागलेल्या भीषण आगीत १२ वर्षाखालील चार मुलांसह एकूण २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजकोटच्या सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) राधिका भराई यांनी सांगितले की, 27 मृत्यूंची पुष्टी झाली आहे. मृतदेह पूर्णपणे जळाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांची ओळख पटवणे कठीण आहे. एसीपी विनायक पटेल यांनी सांगितले की, मृतांमध्ये १२ वर्षांखालील चार मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेला सुटी असल्याने मोठ्या संख्येने मुले आपल्या पालकांसोबत मजा करण्यासाठी टीआरपी गेम झोनमध्ये आली होती.
Approx 26 people, including at least 12 children, were kill*ed in a massive fire in Rajkot. Prayers for them. 🙏 pic.twitter.com/fHGEtHVjnV
— Prayag (@theprayagtiwari) May 25, 2024
एसआयटीला तत्काळ तपास सुरू करण्याच्या सूचना
गृहराज्यमंत्री संघवी यांनी रात्री उशिरा पत्रकारांना सांगितले की, एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. त्या व्यक्तीचा शोध घेणे ही आपली जबाबदारी आहे, तीही आपली पहिली प्राथमिकता आहे. सरकार जास्तीत जास्त पथके तैनात करत आहे. सर्व अधिकाऱ्यांना सकाळी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. या बैठकीत सर्व विभागांचे अधिकारी आणि गेम झोनच्या बांधकामाची जबाबदारी असलेल्या लोकांनाही बोलावण्यात आले होते. एसआयटीला तातडीने तपास सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राजकोटचे पोलिस आयुक्त, राजू भार्गव म्हणाले की, गुजरात पोलिस महासंचालकांनी पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना राज्यात तयार केलेल्या अशा सर्व गेम झोनची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करून विनापरवाना सुरू असलेली केंद्रे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
#WATCH | Gujarat: Morning visuals from TRP game zone in Rajkot where a fire broke out yesterday and claimed 27 lives. pic.twitter.com/rwGnNaJqcC
— ANI (@ANI) May 26, 2024