Monday, December 23, 2024
Homeराज्यदानापूर तंटामुक्ती अध्यक्षपदी राजेश उंबरकार यांची निवड...

दानापूर तंटामुक्ती अध्यक्षपदी राजेश उंबरकार यांची निवड…

दानापूर – गोपाल विरघट

महात्मा गांधी तंटामुक्त गाव पातळीवर अध्यक्षपदाची निवड ग्रामपंचायत कार्यालय दानापूर येथे पार पडली, अध्यक्षपदाच्या निवड करिता ग्रामपंचायत कार्यालय येथे पाच अर्ज प्राप्त झाले होते,

यामध्ये, शे.चांद शे.बादू, तेजराव वाकोडे, रवी वाकोडे, राजेश उंबरकार, गोपाल इनामे यांनी अर्ज भरले होते, वेळेवर गोपाल इनामे, रवी वाकोडे यांनी आपले अर्ज मागे घेतले, यानंतर अध्यक्ष पदाकरीता तिरंगी लढत पाहावयास मिळाली. या निवडीमधे शे.चांद शे.बादु यांना 28 मते तर तेजराव वाकोडे यांना 87 मते व सर्वाधिक 137 मते राजेश उंबरकार यांना मिळाली,

या सभेचे अध्यक्ष सरपंच सौ.सपना वाकोडे यांनी तंटामुक्त अध्यक्षपदाकरिता राजेश उंबरकार यांचे नाव जाहीर केले, राजेश उंबरकार हे साधारण कुटुंबातील व्यक्ती असून मनमिळावू स्वभाव असणारे साधा पानपट्टीचा व्यवसाय करणारे आहेत, त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे त्यांच्यावर गावातून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे दिसून येत आहे,

या सभे करिता ग्राम विकास अधिकारी के.एस.इंगळे, तलाठी अंकुश मानकर, पोलीस पाटील संतोष माकोडे, उपसरपंच सागर ढगे, हिवरखेड पोलीस स्टेशनचे प्रवीण गवळी, सोळंके,ग्रा.पं. सदस्य, पत्रकार, ग्रा.पं.कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: