राहुल मेस्त्री
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS ट्रेड युनियनची )निपाणी IB मध्ये बैठक नुकतीच संपन्न झाली. बुद्ध, महात्मा बसवण्णा, छ. शिवाजी महाराज, संत तुकाराम, संत, गाडगे बाबा, रामस्वामी पेरियार, आण्णा भाऊ साठे, राष्ट्रपिता जोतीराव फुले, छ. शाहूजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा बहुजन महामानवाचा गौरवशाली विचार च आम्हाला तारू शकेल, खाजगीकरण हे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. खाजगीकरणामुळे कर्मचारी, कामगार यांचे शोषण होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांन कामगार मंत्री असताना, देशातील तमाम कामगारांच्या कल्याणासाठी, त्यांना त्यांचा हक्क व न्याय मिळण्यासाठी, 40 कागदे केले होते, ते 40 कायदे रद्द करून कामगाराच्या शोषणाला खतपाणी घालणारे चार कामगार कायदे अंबलात आणले जात आहेत. हे चार कामगार कायदे कामगार व कर्मचारी यांच्या विरोधात आहेत, भविष्यात यांचे वाईट परिणाम दिसून येणार आहेत.
चार कामगार कायदे, 2004 नंतर नोकरी मध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकरी भरती बंद करावी. यासाठी संघटित व असंघटित कामगारांसाठी राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघा मार्फत संघटित लढा उभारणार असल्याचे राजेंद्र इंगोले यांनी सांगितले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक रणजीत माळगे सर यांनी केले. सदर बैठकीला निपाणी, चिकोडी, खानापूर, हुक्केरी तालुक्यातील विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते…