न्यूज डेस्क : राजकारणात साम, दम, दंड, भेद याचा वापर तर करतातच सोबतच नाते संबधात खेळ खेळल्या जातो याच उदाहरण राजस्थानच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. राजस्थानमध्ये भाजपच्या माजी आमदाराच्या मुलीने तिकिटासाठी भावाला चप्पलने मारहाण केल्याचे विचित्र दृश्य पाहायला मिळाले. हे प्रकरण जयपूरमधील भाजप कार्यालयाबाहेरचे आहे. ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी आमदार जयराम जाटव आणि त्यांची मुलगी मीना कुमारी या दोघांनाही पुढील विधानसभा निवडणुकीसाठी अलवर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तिकीट हवे आहे. माजी आमदाराच्या मुलाने वडिलांच्या समर्थनार्थ पोस्टर लावल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मीना कुमारीने भावाला चप्पलने मारहाण केली.
भाजपकडून तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मीना कुमारी यांनीही वडिलांवर गंभीर आरोप केल्याचे सांगण्यात येत आहे. मीना यांनी स्वत:च्या वडिलांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले असून तिचे वडील जयराम जाटव यांनी चुकीच्या पद्धतीने जमीन घेतल्याचा दावा केला आहे.
आपल्या जीवाला धोका असल्याचे वर्णन करत मीना कुमारने तिचे वडील आणि भावावरही तिला धमकी दिल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे भावाला चप्पलने मारहाण झाल्याच्या घटनेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, कोणालाही निवडणूक लढवण्याचा आणि पक्षाकडून तिकीट मिळवण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी निश्चितपणे सांगितले.
बेटी मीना कुमारी जाटव, बाप को नही बल्कि पूर्व विधायक बाप, जयराम जाटव के करीबी पूर्व सरपंच को जूती मारने का प्रयास कर रही थी ! But जूती पड़ गयी मीना कुमारी के भाई व जयराम जाटव के भाई राजेन्द्र को….
— Samar Gupta (@samargupt) October 6, 2023
गजब की चाल-चरित्र चहेरे वाली पार्टी है @BJP4Rajasthan pic.twitter.com/Dd68kZqKVc