Rajasthan : जैसलमेरच्या पिथाला-जझिया गावात गुरुवारी सकाळी एक मानवरहित टोही विमान कोसळले. या अपघातात जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली होती. गावकऱ्यांच्या माहितीवरून हवाई दलाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. या विमानाचा वापर आकाशातील हेरगिरीच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो.
प्राथमिक माहितीनुसार, सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी सकाळी हवाई दलाच्या टोही विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर काही तांत्रिक बिघाडामुळे विमान अचानक कोसळले आणि लोकवस्तीपासून दूर वालुकामय किनाऱ्यावर पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र, निर्जन भागात विमान कोसळल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून विमानाच्या अवशेषाचा आढावा घेतला. या घटनेची वार्ता आजूबाजूच्या ग्रामीण भागात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले.
One Remotely Piloted Aircraft of the Indian Air Force met with an accident near Jaisalmer today during a routine training sortie. No damage to any personnel or property has been reported. A Court of Inquiry has been constituted to find out the cause of the accident.
— Indian Air Force (@IAF_MCC) April 25, 2024
काही वेळाने जैसलमेर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि बचाव व मदत वाहनेही घटनास्थळी पोहोचली. दुसरीकडे, जैसलमेर पोलिस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या विमान अपघाताची माहिती मिळाली असून, हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळाची पाहणी करत असून, अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.