Tuesday, December 24, 2024
HomeBreaking NewsRajsthan Accident | सीकरमध्ये कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात...धडक होताच...

Rajsthan Accident | सीकरमध्ये कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात…धडक होताच कार ने घेतला पेट…दोन मुलांसह सात जण जिवंत जळाले… पाहा व्हिडिओ

Rajsthan Accident : सीकर जिल्ह्यातील फतेहपूर शेखावती येथील आशीर्वाद चौकाजवळील पुलावर रविवारी दुपारी कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत कारमध्ये प्रवास करणारे सात जण जिवंत जळाले. कारमध्ये दोन मुले आणि तीन महिलांसह सात जण होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पुलावर कार पुढे जाणाऱ्या ट्रकला धडकली. अपघातानंतर कारने पेट घेतला ही आग एवढी भीषण होती की काही वेळातच आगीने कारला कवेत घेतले आणि कारमधील लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.

पोलिस उपअधीक्षक (फतेहपूर सर्कल) रामप्रताप बिश्नोई यांनी सांगितले की, कारमधील सर्व लोक मेरठ, उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. सालासर बालाजी मंदिराकडून हिसारकडे जात होते. यादरम्यान त्यांचा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. कारमधील मृत प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेले फतेहपूर शेखावती पोलीस मृताची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: