सांगली – ज्योती मोरे
राजर्षी शाहू महाराजांची जयंती आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी ” राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण, शेती, अस्पृशता निवारण या क्षेत्रात केलेले काम देशातील अन्य कुठल्याही संस्थानात झाले नाही. शाळांची संख्या वाढवून बहुजन समाजातील सर्व मुले शिक्षण घेतील याची व्यवस्था राजर्षी शाहू महाराजांनी केली. कोल्हापुरात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधली.
अस्पृश्य मुलांना वर्गाबाहेर बसवण्याची पद्धत रद्द करून अन्य मुलांसोबत बसवण्यासाठी आज्ञा काढली. शेतीला पाणीपुरवठ्यासाठी प्रसंगी कर्ज काढून राधानगरी धरण बांधले. समाजाच्या सर्व क्षेत्रातील राजर्षी शाहू महाराजांचे काम क्रांतीदर्शी होते.
असे विचार प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार यांनी व्यक्त केले. भाजपा कार्यालयात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन सभेत श्री. शेखर इनामदार बोलत होते. राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून १०० फुटी रस्त्यास राजर्षी शाहू महाराज मार्ग दिशादर्शक फलकाचे अनावरण सांगली विधानसभा प्रमुख शेखर इनामदार यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी भाजपा अनुसूचित जाती जमातीचे सरचिटणीस मोहन व्हनखंडे, संघटन सरचिटणीस दीपक माने, ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बिर्जे, नगरसेवक संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, प्रकाश ढंग नगरसेविका अप्सरा वायदंडे, महिला उपाध्यक्ष माधुरी वसगडेकर,
मध्यमंडल अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, चंद्रकांत घुनके, सचिन बालनाईक, अतुल माने, गणपती साळुंखे, हालेश शिंगाडे, आबासाहेब जाधव, सतीश फोंडे, बबलू आलमेल, गौस पठाण आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.