सांगली – ज्योती मोरे.
राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनाम धामणी या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार 2023 हा समारंभ आज सांगलीतील राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.
सदर समारंभात सुरवातीला स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सौ.पद्मजा परशुराम चितळे.राहणार- भिलवडी, तालुका-पलूस,.सौ.राजश्री माधव देशमुख. राहणार- विटा, श्रीमती विजया नरेंद्र पाटील राहणार- सांगली, सौ. मीराबाई लक्ष्मण खिलारी. राहणार- करगणी, तालुका- आटपाडी,श्रीमती आनंदीबाई गजाननराव चव्हाण.राहणार-मिरज, सौ.वासंती शंकर कुंभार. राहणार- वज्रचौंड,तालुका -तासगाव,श्रीमती शांताबाई महादेव कोट्याळ.राहणार-इनामधामणी,तालुका-मिरज,सौ. शालन रामचंद्र जगताप.
राहणार- वडियेरायबाग, तालुका-कडेगाव, श्रीमती रागिनी शिवाजी पाटील. राहणार-शिरढोण, तालुका- कवठेमंकाळ,सौ.अक्काताई शशिकांत मदने. राहणार-इस्लामपूर, तालुका- वाळवा, श्रीमती लक्ष्मीबाई श्रीपती खरात. राहणार- बाज. तालुका- जत, आणि सुहासिनी वसंत काकडे. राहणार-बत्तीसशिराळा,तालुका- शिराळा.
या सर्व मातांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा शैलजा पाटील आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. यावेळी निमंत्रक तथा राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या सचिव सौ.मालुश्री विठ्ठलराव पाटील,श्री विठ्ठलराव पाटील आदींसह इतर अनेक मान्यवर आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.