अमोल साबळे नया अंदुरा
गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि मुसळधार पाऊस सुरू असल्याने नया अंदुरा परिसरातील खरीप पिके कपाशी, सोयाबीन, तूर पिकांत पाऊसाचे पाणी साचलेल्याने त्यामुळे पिकांच्या उत्पादन घटणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्च वसूल होणार की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत सापडला आहे.गतवर्षी दुष्काळी परिस्थितीत पिकांच्या उत्पादनात प्रचंड कमी झाल्याने, शेतकरी संकटात सापडला होता.
यावर्षीच्या खरीप हंगामात पाऊसाला उशीर आल्याने मूग व उडीद पिकाचे उत्पादन बुडाले. विलंबाने सुरू झालेल्या रिमझिम पावसात कपाशी, सोयाबीन, तूर व इतर पिकांच्या पेरण्या उरकल्यानंतर पावसात खंड पडला होता. परंतु जुलैपासून तर अॉगस्ट मधे सतत ढगाळ वातावरण आणि कधी रिमझिम तर कधी जोरदार पाऊस बरसत असल्याने,निंबा फाटा, नया अंदुरा, कारंजा रम, हाता, अंदुरा, सोनाळा, निंबा, अंञी, हातरूण, शिंगोली, मालवाडा, लोणाग्रा, निंबा फाटा परिसरातील सोयाबीन कपाशी व तूर इत्यादी पिके मधे पाणी थाबंत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे.
त्यामुळे पिकांच्या उत्पादनात कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही वसूल होणार की नाही, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.तण वाढले; निंदन, डवरणी इत्यादी कामे थांबल्याने शेतमजुर व शेतकरी घरी बसला आहे त्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे