Tuesday, November 5, 2024
HomeMarathi News Todayपुण्याच्या पोट निवडणुकीत पैशांचा पाउस...भाजपच्या एका कार्यकर्त्याला पैसे वाटप करताना पकडले...पहा व्हिडीओ

पुण्याच्या पोट निवडणुकीत पैशांचा पाउस…भाजपच्या एका कार्यकर्त्याला पैसे वाटप करताना पकडले…पहा व्हिडीओ

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीची रंगत वाढत असून या निवडणुकीत भाजप सर्रास पैशांचा पाउस पाडत असल्याचे दिसत आहे.काल एका भाजपच्या कार्यकर्त्याला पैसे वाटप करताना रंगेहात पकडले असल्याचा Video सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर मोठा आरोप केला. भाजपकडून पोलिसांना हाताशी धरून पैसे वाटप केले जात असल्याचा खळबळजनक आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

पुण्यातील पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. त्यासाठी भाजपा मोठ्या ताकदीने प्रचारासोबतच मतदारांना पैसे वाटप केल्या जात असल्याचे समजल्यावर काही कार्यकर्त्यांनी रहाटणी शिवराज कॅालणी तांबे शाळे जवळ भा ज प चे प्रभाग क्र३३ चे अध्यक्ष माधव मनोरे यांना पैसे वाटप करताना पकडले. त्यांच्या कडून 2 हजारांच्या नोटांचे बंडल जप्त करण्यात आले आल्यात. हे प्रकरण समजताच रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. कसबा गणपतीसमोर पत्नीसह ते उपोषणाला बसत आहेत. धंगेकर यांच्यासोबत काँग्रेस नेतेही उपोषणाला बसत आहेत.

उपोषणाला बसण्यासाठी जाताना रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘ पुण्यात पैशांचा पाऊस पडतोय. भाजपतर्फे लोकांना पैसे वाटले जात आहेत. पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. पोलिसांनी माझ्या कार्यकर्त्यांना बोलावून दमदाटी केली. काल मी एका पोलीस अधिकाऱ्याला भेटलो. तो हतबल होता. पण आज जनतेसमोर मला हे बोलावच लागेल. भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे, असा दावाही धंगेकर यांनी केलाय.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: