Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीयवतमाळ येथील करोडो रुपयाचा रेल्वे गौण खनिज भ्रष्टाचार आता नागपुरात गाजणार...

यवतमाळ येथील करोडो रुपयाचा रेल्वे गौण खनिज भ्रष्टाचार आता नागपुरात गाजणार…

नागपूर

बहुचर्चित वर्धा – यवतमाळ- नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातील करोडो रुपयाच्या भ्रष्टाचार प्रकरणावर आयुक्त, अमरावती .जिल्हाधिकारी ,यवतमाळ. यांनी हेतू पुरस्सर जाणून बुजून भ्रष्टाचाऱ्याना पाठीशी घालून वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे ,त्याचबरोबर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी तर आंदोलनकर्त्यांचा अपमान करून स्पष्टपणे लोकशाहीलाच नाकारलं असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे तक्रारदार तसेच नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट, महाराष्ट्र चे राज्यसचिव विसल ब्लोअर अमोल कोमावार यांनी न्यायासाठी व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी उपमुख्यमंत्री तथा राज्यगृहमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांना तक्रार /निवेदन दिले. त्याचबरोबर तीन दिवसात कारवाई न झाल्यास संविधान चौक नागपूर येथे आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा निवेदनाद्वारे देण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे उत्खननातील करोडो रुपयाचा भ्रष्टाचार हा सर्व साक्षी पुराव्यानिशी उघडकीस आल्यानंतर सुद्धा संबंधित वरिष्ठ अधिकारी हे जाणून-बुजून जाणीवपूर्वक भ्रष्टाचारांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना दुसऱ्या बाजूने तक्रारदार तसेच नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट चे राज्यसचिव ,विसल ब्लोअर अमोल कोमावार यांनी भ्रष्टाचारी व त्यांच्या सोबत असणारे सहकारी मित्र , कंत्राटदार ,उपकंत्राटदार यांच्या भ्रष्टाचाराची मालिका उघडकीस आणण्यासाठी संबंधित मंत्री महोदय यांना निवेदन देऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा धडाकाच लावला आहे .त्यामुळे सध्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमध्ये कारवाईच्या भीतीने हडकंप सुटलेला आहे.

तक्रारदाराला संपविण्यासाठी सुपारी घेतल्यापासून तर वेगवेगळ्या मार्गाने दडपण आणण्यासाठी पुरेपूर केलेले सर्व प्रयत्न असफल झाल्यामुळे व तक्रारदार कुठल्याही परिस्थितीत थांबत नसल्यामुळे कंत्राटदार /उप कंत्राटदार व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमध्ये सध्या “जेल “या शब्दाचे डोहाळे लागलेले दिसताना सुद्धा किंवा त्या प्रकारच्या चर्चेला उधान आले असल्याचे सुद्धा ऐकण्यात येत आहे.

कुणाल झाल्टे तहसीलदार यवतमाळ यांनी तर कुठल्याही संबंधित विभागाला तक्रारदाराने तक्रार केल्यास फक्त आणि फक्त एकच उत्तर तेही कुठलाही तक्रारीशी संबंध नसलेले देण्याचा व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना व पत्रकारांना मूर्ख बनवण्याचा किंवा त्यांची दिशाभूल करण्याचा सपाटाच लावलेला दिसत आहे.

त्याचबरोबर या प्रकरणातून पळवाट काढण्यासाठी पदाचा ,पैशाचा ,संबंधाचा दुरउपयोग करून वागत असतानाचे सुद्धा चित्र स्पष्ट निदर्शनास येत आहे. त्यामुळेआता सध्या सर्वांचे लक्ष करोडो रुपयाच्या भ्रष्टाचार प्रकरणातील गंभीर विषयांवर मंत्री महोदयांच्या कारवाईकडे तसेच नागपूर येथील आंदोलनाच्या परिणामाकडेच लागलेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: