ओडिशातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ झालेला रेल्वे अपघात शतकातील मोठा अपघात आहे. या अपघातील मृतांची संख्या पाहून मन सुन्न झाले. अपघातात एकही बळी जाऊ नये अशीच अपेक्षा आहे अपघात रोखणारे महाकवच मोठा गाजावाचा करु आणले होते ते कोठे गेले? एवढा मोठा अपाघात झाला त्याची जबाबदारी कोणावर तरी निश्चित झाली पाहिजे. ओडीशा अपघातीची नैतिक जबाबदारी म्हणून रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, १९५६ साली महबूबनगर रेल्वे अपघात झाला असताना तत्कालीन रेल्वे मंत्री लालबहाद्दुर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. आजचा अपघात भयंकर आहे, जिवित हानी प्रचंड झाली आहे, त्याची जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुळात रेल्वे मंत्री असतात कुठे हाच प्रश्न आहे. देशात कुठेही रेल्वेला हिरवा झेंडा दाखवायचा असेल तर पंतप्रधानाच असतात. ओडीशातील रेल्वे अपतात अत्यंत भयानक व दुःखद आहे. याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.
निळवंडे प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न…
अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारा निळवंडे प्रकल्प व्हावा हे स्वप्न आम्ही पाहिले होते. आज आमचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद होत आहे. या प्रकल्पासाठी शासनस्तरावर सातत्याने आम्ही पाठपुरावा केला त्यामुळेच आज दुष्काळी भागाला पाणी मिळत आहे. पण काही लोक निळवंडे प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. केवळ पाणी सोडण्याची संधी मिळाली म्हणजे काम त्यांनी केले असे होत नाही. जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे की या प्रकल्पासाठी कोणी प्रयत्न केले. कोणी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये, लोकांना पाणी मिळाले याचा आम्हाला आनंद आहे, असेही थोरात म्हणाले.