Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीकाशीद समुद्रात ५ विद्यार्थी बुडाले!...३ जणाना वाचविण्यात यश...दोघांचा मृतदेह सापडला...

काशीद समुद्रात ५ विद्यार्थी बुडाले!…३ जणाना वाचविण्यात यश…दोघांचा मृतदेह सापडला…

किरण बाथम /कोकण ब्युरो चीफ

मुरुड तालुक्यातील काशिद बीच वर औरंगाबाद येथील कन्नड शहरातील साने गुरुजी माध्यमिक विद्यालातील ८०जणांची सहल मुरुड -काशिद बीचवर फिरण्यासाठी आले होते.दुपारी ३च्या दरम्यान रोहन दिलीप महाजन वय – १५ वर्षे,तुषार हरिभाऊ वाघ वय – १५ वर्ष,कृष्णा विजय पाटील वय- १५ वर्षे ,प्रणव सजन कदम वय १५वर्ष मयत, रोहन संतोष बेडवाल वय-१५ हे ५जण विद्यार्थी पोहण्यासाठी उतरले.

परंतु पाण्याला घाबरून १ जण आधीच किनारा वर आला आणि ५ जण पाण्यात पोहत राहिले.पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ४जण बुडु लागले.जवळच त्या विद्यालयातील शिक्षक व स्थानिक यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.त्या पैकी ३जणांना वाचविण्यात यश आले.परंतु दोघे समुद्रात खेचले गेले आणि दोघांचा त्यात मृत्यू झाला त्यापैकी प्रणव सजन कदम वय १५वर्ष याला शोधण्यात यश आलं.

त्यानंतर सायंकाळी ५.३०वाजच्या दरम्यान रोहन संतोष बेडवाल वय-१५ यांला स्थानिक व त्याठिकाणीचे बोटीच्या मदतीने शोधण्यास यश आले.वाचविण्यात आलेल्या रोहन दिलीप महाजन वय – १५ वर्षे,तुषार हरिभाऊ वाघ वय – १५ वर्ष,कृष्णा विजय पाटील वय- १५ वर्षे या तीघांना अलिबाग येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: