Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीनांदेड शहरात आयकर विभागाचे धाडसत्र...एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी...

नांदेड शहरात आयकर विभागाचे धाडसत्र…एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी…

महेंद्र गायकवाड
नांदेड : शहरातील शिवाजीनगर भागात शुक्रवारी सकाळपासूनच आयकर विभागाचा मोठा फौजफाटा आपल्या असंख्य वाहनासह दाखल झाला होता.आयकर विभागाने खासगी फायनान्स चालवणाऱ्या संचालकांच्या कार्यालयावर व घरावर धाड टाकली असून एकाच वेळी अनेक ठिकाणी आयकर विभागाने या धाडी टाकल्या असल्याने या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दानाणले आहे.

नांदेड शहरात व परिसरात खासगी फायनान्स व अवैध सावकारी चालवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यात काही पतसंस्थांबरोबरच खासगी सावकारांचाही समावेश आहे.
शहरातील शिवाजी नगर भागात दि.१० मे रोजी सकाळी ७.३० वा. आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा शिवाजीनगर परिसरातील एका फायनान्स कंपनीच्या संचालकांच्या घरावर धडकला. शहरातील शिवाजीनगरसह अलीभाई टॉवर, कोकाटे कॉम्प्लेक्स
येथील फायनान्स कंपनीच्या शाखांवरही त्यांनी धाड टाकली. सद्यस्थितीत भंडारी फायनान्स व आदिनाथ अर्बन सोसायटी या पतसंस्थेतील कारभाराची चौकशी
सुरू असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: