Tuesday, December 24, 2024
Homeगुन्हेगारीपातुरात अवैध रित्या जुगार खेळणाऱ्यांवर व दारू विक्री करण्यावर छापा...४ आरोपी रंगेहाथ...

पातुरात अवैध रित्या जुगार खेळणाऱ्यांवर व दारू विक्री करण्यावर छापा…४ आरोपी रंगेहाथ अटक…अकोला विशेष पथकाची कारवाई…

निशांत गवई, पातुर

पातूर : आज दि : १२/१०/२०२२ रोजी पोलिस अधीक्षक जी श्रीधर साहेब अकोला यांच्या आदेशाने विशेष पथक अकोला शहरात व जिल्ह्यात अवैध धंद्यावर रेड करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमी दारकडून खात्रीलायक बातमी मिळाली की युनियन बँक आठवडी बाजार पातूर येथे काही इसम अवैध रित्या वरली जुगाराच्या अकडयावर नगदी पैश्याची हारजीत लावून जुगार खेळत आहे व एक इसम आपल्या राहत्या घरी अवैध रित्या दारू बाळगुन विक्री करीत आहे.

तेथे पाहणी केली असता तीन इसम १) शेख अहमद शेख आमद वय ४७ वर्ष रा मुजावपुरा पातूर २) सय्यद राजिक सय्यद बुरहान वय ३२ रा कशिडपुरा पातूर ३)भास्कर तुळशीराम माहुलकर वय ५० वर्ष रा देशमुख वेस पातूर यांच्या जवळून वरली जुगाराचा साहित्य व नगदी रक्कम ४,४२०रू चा मुदेमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध पो स्टे पातूर येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे व एक इसम सचिन मनोहर गाडगे वय ३८ रा जुना आगीखेड हा आपल्या घरी अवैध रित्या देशदारू विक्री करताना मिळून आला त्याचा जवळून देसी दारू सखू संत्रा चे एकूण ४४ कवॉटर किँमत २९८० रू चा मुदेमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध पो स्टे पातूर येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सदर दोन कारवाहित एकूण चार आरोपीन विरुद्ध पो स्टे पातूर येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्यांच्या जवळून ७४०० रू चा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे
सदर कारवाही माननीय पोलिस अधीक्षक जी श्रीधर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील साहेब व त्यांच्या पथकांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: